चोपडा (प्रतिनिधी) चोपडा नगरपालिका हद्दीतील कॉलनी नित्तल पार्क, गुरुकुल नगर येथील रहिवाशांचे नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे हाल होत आहेत. घरपट्टी, पानपट्टी आदी प्रकारचे सर्व कर वेळेवर भरून देखील सुविधा मिळत नसल्याचे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
रस्त्याअभावी नित्तल पार्क मधील शाळेचे विद्यार्थी व गुरुकुल नगर मधील रहिवासी यांचे वाहन नेहमी स्लीप होऊन पाण्याच्या डबक्यात पडतात. मालवाहतूक गाड्या देखील या डबक्यांमध्ये खचत असतात. याच्या सर्व त्रास कॉलनीतील रहिवाशांना होतो. वाहन फसले की कॉलनीतील रहिवासी संबंधितांना वाहन काढण्यासाठी मदत करावी लागते.
नगरपालिकेचे कोणतेही कर्मचारी अथवा अधिकारी नित्तल पार्कमध्ये येण्यास तयार नसतात. कारण या ठिकाणी त्यांची वाहने पाण्याच्या डबक्यात खचण्यासाठी घाबरतात. मग कॉलनीतील रहिवाशांनी कसं करावं?, कॉलनीतील रहिवाशी हे माणसं नाहीत काॽ असा प्रश्न उभा राहत आहे. नगरपालिका नेहमी खोटे आश्वासन देत असते. ऑफिसमधून जर अधिकारी बाहेर निघत नसतील तर त्यांना शहरातील रस्त्यांची दुरावस्था कशी समजेल. अनेक वेळा तक्रार करून देखील नगरपालिका हेतू पुरस्कर दुर्लक्ष नित्तल पार्क, गुरुकुल नगर या कॉलनीमध्ये करत असते. फक्त वर्षातून एकच वेळा नगरपालिका कर्मचारी कॉलन्यांमध्ये फिरतात ते फक्त कर वसूल करण्यासाठी. इतर केव्हाही कॉलनी परिसरात कोणीही येत नसतं. गटार साफ करायला देखील नगरपालिकेत वारंवार फोन करावा लागतो.
नित्तल पार्कमध्ये एवढे घाणीचे साम्राज्य पसरले आहे की, प्रत्येक घरात रुग्ण आढळून येत आहेत. तरी देखील नगरपालिकेने झोपेचे सोंग घेतले आहे.नगरपालिकेचे अधिकारी सांगतात की, 400 ब्रास मुरूम टेंडर पास आहे. मग 400 ब्रास मधून किती मुरूम आजपर्यंत कॉलनी परिसरात नगरपालिकेने टाकला आहे?,. असा यक्षप्रश्न देखील येथील नागरिक विचारात आहे.
याबाबत नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिलीत.
400 ब्रास मधून बाकीचा मुरूम गेला कुठं? हा मोठा प्रश्न नागरिकांमध्ये उद्भवत आहे. या 400 ब्रास मुरूमच्या सर्वे हे चोपडा कॉलनीतील नागरिकांकडे जाऊन सर्वे करत आहेत. जर 400 ब्रास टेंडर मुरूम पास आहे मग या कॉलनी एरियामध्ये रस्ता का नाही?, मग साधारण मुरूम देखील का टाकला गेलेला नाही बाकीचा मुरूम गेला कुठं..? का मुरुम मलिदा नेमकं कोणाच्या घश्यात जात आहे. याबाबत देखील सखोल चौकशी व्हावी असा ही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.