चाळीसगाव (प्रतिनिधी) गुरुवारी संध्याकाळी पाटणादेवी व पिंपरखेड परिसरात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतीमाल, घरांचे व जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना गावकऱ्यांना धीर देत अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
पाटणादेवी व पिंपरखेड परिसरात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतीमाल, घरांचे व जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यासोबत जाऊन झालेल्या नुकसानीची तात्काळ पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना गावकऱ्यांना धीर दिला व तहसीलदार यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. तसेच तात्काळ जळगाव जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवर चर्चा करून झालेल्या नुकसानीची माहिती दिली नुकसानभरपाई चा प्रस्ताव तातडीने राज्य सरकारकडे पाठविण्याचे सूचित केले.