TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १३३ कोटी अनुदान वितरणाला आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते सुरुवात !

पुढील ४८ तासात चाळीसगाव तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होणार !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 14, 2024
in चाळीसगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) राज्य शासनाने राज्यातील ४० दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी दुष्काळी अनुदान वितरित करण्याचा शासन निर्णय २९ फेब्रुवारी घेतला होता. त्यात चाळीसगाव तालुक्यातील ८४ हजार ४७१ शेतकऱ्यांना जवळपास १३३ कोटी १९ लाखांचे अनुदान मंजूर झाले असून ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची सुरुवात आज आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली. दरम्यान, येत्या ४८ तासात चाळीसगाव तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यात ही अनुदानाची रक्कम जमा होणार आहे.

यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील, नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यास मदतीची मर्यादा २ हेक्टर वरून ३ हेक्टर केली आहे. तसेच प्रति हेक्टरी अनुदान देखील वाढविण्यात आले असून त्यात बहुवार्षिक पिके – २२५००/- प्रति हेक्टर, बागायत – १७५००/- प्रति हेक्टर, कोरडवाहू – ८५००/- प्रति हेक्टर अश्या वाढीव दराने शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करण्यात येणार आहे.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

चाळीसगाव तालुक्याला प्रथमच एकरकमी १०० कोटींच्यावर मदत मिळाली आहे. शासन निर्णय झाल्याच्या १५ दिवसांच्या आत सदर मदत वितरित केल्याबद्दल मी प्रशासनाचे आभार, असे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी म्हटले आहे. तसेच ऑगस्ट २०२१ मध्ये महापुरात घर जनावरे दुकाने जमीन खरडणे नुकसान झालेल्या महापूरग्रस्तांना ६ कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडल्या होत्या अश्या १९ गावातील ५६७ शेतकऱ्यांना 80 लाख निधीचे प्राप्त आहे. येत्या ८ दिवसांच्या आत त्यांची नुकसानभरपाई थेट बँक खात्यात जमा होईल.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव तालुक्यात पुढील काळात चारा छावणी, पाणी टँकर, शैक्षणिक शुल्कमाफी, पीककर्ज पुनर्गठन यामाध्यमातून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. ही भरघोस अशी मदत मंजूर केल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिलदादा पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चाळीसगाव वासीयांच्या वतीने आभार मानतो,असेही आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
Next Post

रक्षाताई खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये 'ना -राजीनामा' सत्र !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे जळगाव विमानतळावर स्वागत !

August 25, 2024

प्रचाराचा ताफा घेऊन रोहिणी खडसे पोहचल्या शेताच्या बांधावर

October 25, 2024

भारतीय रुपया आणखी घसरला ; डॉलर वधारला

May 12, 2022

जिल्हा कृषी औद्योगिक संस्थेची रोहित निकम यांच्या नेतृत्वाखाली निवडणुक बिनविरोध

March 9, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group