TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रचाराचा ताफा घेऊन रोहिणी खडसे पोहचल्या शेताच्या बांधावर

पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून ओला दुष्काळ जाहिर करण्याची केली मागणी

vijay waghmare by vijay waghmare
October 25, 2024
in बोदवड, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड : सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रत्येक उमेदवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या प्रचारात व्यस्त आहेत. कमी वेळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न असतो. पण, अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडी तर्फे रोहिणी खडसे यांनी आपला प्रचाराचा ताफा थेट शेताच्या बांधावर वळवला. आणि पिकांचे नुकसानीची पाहणी करून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडी तर्फे रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर झालेली असून त्यांनी काल गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या सुद्धा प्रचाराला लागल्या आहेत. आज शुक्रवार रोजी त्या बोदवड तालुक्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना बोदवड वरून शेलवडकडे जाताना पावसामुळे शेतातील पिकांचे झालेले नुकसान बघून रोहिणी खडसे यांनी आपला प्रचाराचा ताफा शेताकडे वळवून शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला आणि शेतकऱ्यांच्या प्रती असलेली आपली संवेदनशीलता दाखवून दिली.

READ ALSO

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या की, बोदवड तालुक्यात झालेल्या परतीच्या सततच्या संततधार पावसामुळे ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी बांधव अडचणीत सापडले असून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडी शेतकरी बांधवांसोबत आहोत. सरकारने आचारसंहिता शिथिल करून या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी आपली मागणी असल्याचे सांगितले. यापूर्वी सुद्धा आपण निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी केलेली आहे. परंतु , त्यावर सरकारने कोणतेही पाऊले उचलले नाहीत

शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या संततधार पावसामुळे शेतात कापणी केलेला मका आणि सोयाबीनला कोंब फुटून पिके जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तर कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट होऊन जेमतेम उत्पादन होऊ शकेल, अशी परिस्थिती असताना सततच्या संततधार पावसामुळे फुटलेला कापूस लोंबकळून त्याला कोंब फुटले आहेत. तर कैऱ्या काळवंडून सडत आहेत. त्यामुळे शेतकरी बंधूंचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतकरी बांधवांचा या खरीप हंगामात बी बियाणे किटकनाशके खते यांच्यावर झालेला खर्च सुद्धा निघणे अवघड झाले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी बांधवांचे दिवाळे निघाल्याने शेतकरी बांधव आर्थिक गर्तेत सापडला आहे.

सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा

सरकारने आचारसंहिता बाजूला सारून सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून या गंभीर संकटात शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहून शेतकरी बांधवांना आधार द्यावा. तसेच शेतकरी बांधवांनी बोदवड तालुक्यात मोठ्या क्षेत्रावर केळी पिकाची लागवड केली असून पीक विमा योजनेसाठी आवश्यक असलेल्या क्षेत्रा एवढी ही लागवड असल्याकारणाने बोदवड तालुक्याचा केळी पीक विमा योजनेत समावेश करावा. पिक विमा कंपन्यांनी अजूनही नुकसानीचे पंचनामे केलेले नसून पिक विमा कंपन्यांना नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी असल्याचे रोहिणी खडसे यांनी केली आहे. शेतातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर रोहिणी खडसे यांनी शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांसह बोदवड तहसील कार्यालय गाठून सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत तहसीलदार यांना निवेदन दिले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना(उबाठा) महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस अवॉर्ड’ने मुंबईत जैन इरिगेशन परिवाराचा झाला गौरव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डोळ्यासमोर मुलीचे अपहरण, पालकांनी उचललं टोकचं पाऊल ; आरोपीच्या घरासमोरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार !

May 31, 2023

विवाहिता धर्मपरिवर्तन प्रकरण : जामनेर पोलिसांची भूमिका संशयास्पद ; फिर्यादीतून धर्मपरिवर्तनसह अनेक मुद्दे वगळले !

December 10, 2020

मोठी बातमी : शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाची धाड !

February 25, 2022

भारतीय जैन संघटना व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमान डोळे तपासणी शिबिर !

September 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group