जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हाअध्यक्ष तथा जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार मा सुरेश भोळे (राजु मामा) यांचा आज भारतीय जनता पार्टी जिल्हा महानगर तर्फे ‘जन सेवा हिच राष्ट्र सेवा’ या भावनेने आ. सुरेश भोळे यांचा वाढदिवस साजरा केला.
सकाळी १० वाजता पांझरा पोळ येथे जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या हस्ते गोशाळेत गाईंना गो ग्रास (लापसी देऊन) कार्यक्रमाची सुरुवात केली. या नंतर ११ वाजता भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे कोरोना काळात मयत झालेल्या व्यक्तीच्या २५ मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच दुपारी १२ मातोश्री वृध्दाश्रम येथे आजी आजोबा यांना पुरण पोळी व आमरस जेवनाचा आस्वाद दिला. तसेच भारतीय जनता पार्टी महानगरातील ९ मंडला वृक्षारोपण, रक्त दान, कार्यक्रम घेण्यात आले.
मुख्य कार्यक्रम भारतीय जनता पार्टी कार्यालय वसंत स्मृति येथे घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल त्रिपाठी यांनी केले व दिपक सुर्यवंशी यांनी आ सुरेश भोळे यांच्या विषयी सांगितले कि सर्व सामान्य जनतेच्या सुख दुःखात सहभागी व अहोरात्र जनतेची सेवा करणारे आपले सर्वांचे लाडके आमदार सुरेश दामु भोळे होय. संपूर्ण महाराष्ट्र मामा च्या कार्याची दखल घेतली जात असुन हि आपल्याला अभिमानाची गोष्ट असुन अश्या लोकप्रिय नेतृत्वास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आ राजु मामा यांच्या कार्याविषयी जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मनोज भांडारकर, प्रल्हाद सोनवणे यांनी अनुभव सांगितले.
कार्यक्रमा प्रसंगी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, जि प सभापती प्रभाकर अप्पा सोनवणे, भरारी फॉडेशनचे दीपक परदेशी, जिल्हा पदाधिकारी महेश चौधरी, डॉ. वीरेन खडके, राहुल वाघ, राजू मराठे, रेखाताई कुलकर्णी, मनोज भांडारकर, धीरज वर्मा, प्रकाश पंडित, गणेश माळी, विठ्ठल पाटील, मंडल अध्यक्ष शक्ति महाजन, उमेश सुर्यवंशी, नगरसेवक मयूर कापसे, सुरेश सोनवणे, आघाडी अध्यक्ष.हेमंत जोशीं, लाता ताई बाविस्कर, आनंद सपकाळे, प्रमोद वाणी,प्रल्हाद सोनवणे, संजय वाणी, गणेश पाटील, दीपक बाविस्कर, भास्कर जुनागाढे, मालती जुनागाढे,महिला मोर्चा सरोज ताई पाठक, शोभाताई कुलकर्णी, पूजा पाटील, छाया सारस्वत, शालू जाधव युवा मोर्चाचे अबोली पाटील, मिलिंद चौधरी, जितेंद्र चौथे, गौरव पाटील, दिनेश पुरोहित, यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस महेश जोशीं यांनी केले.