कासोदा ता, एरंडोल (प्रतिनिधी) कर्जत जामखेड येथील आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री आईसाहेब सुनंदाताई पवार यानी वनकोठे, ता.एरंडोल येथील वसंत सहकारी साखर कारखाना परिसरातील श्री. दत्त मंदिराला सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदिप गुलाबराव वाघ यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी कामगार युनियनचे राजू दादा पाटील, महादू नाना पाटील, पंडित देसले, दुर्गादास बाबुराव देशमुख, चंदू पवार, डॉ. संदिप पाटील, चेतन पाटील, शुभम पाटील, दिपक पाटील, देवा पाटील आदी उपस्थित होते.