TheClearNews.Com
Saturday, July 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात अतिक्रमणातील भेदभावाविरोधात मनसे आक्रमक; हॉकर्स झोनसाठी ठोस मागणी…

vijay waghmare by vijay waghmare
April 9, 2026
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी: शहरातील अतिक्रमण कारवाईत होत असलेल्या कथित भेदभावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देत प्रशासनाला जाब विचारला आहे. खोटे नगर ते कालिका माता मंदिर या प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, विशेषतः परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून रस्त्यावर विविध साहित्य विक्री सुरू असतानाही अतिक्रमण विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

याउलट, स्थानिक मराठी तरुण उपजीविकेसाठी छोटे-मोठे व्यवसाय करत असताना त्यांच्यावर मात्र कठोर कारवाई केली जात असल्याने शहरात तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. “अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत दुहेरी निकष लावले जात आहेत का?” असा सवाल उपस्थित करत मनसेने प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

READ ALSO

टहाकळी येथील बालिकेच्या मृत्यूप्रकरणी खडसेंचा जाब; प्रशासनाकडून चौकशी सुरू

जळगावमधील कुपोषण मुद्यावर खडसेंनी उपस्थित केला प्रश्न; कुपोषणाचे प्रमाण घटल्याचा प्रशासनाचा दावा

या पार्श्वभूमीवर मनसेने हॉकर्स धोरणाबाबत सविस्तर भूमिका मांडत, शहरात नियोजित व कायदेशीर हॉकर्स झोन तातडीने निश्चित करण्याची मागणी केली आहे. शहरातील लघु व्यावसायिकांना योग्य जागा, मूलभूत सुविधा आणि कायदेशीर संरक्षण मिळावे, यासाठी हॉकर्स नियमावलीचे काटेकोर पालन करण्यात यावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः स्थानिक मराठी तरुणांसाठी स्वतंत्र व सुसज्ज हॉकर्स झोन आखण्यात यावा, जेणेकरून त्यांना सन्मानाने व्यवसाय करता येईल, अशी ठाम मागणी करण्यात आली.

मनसेने स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, “जोपर्यंत अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता येत नाही आणि सर्वांवर समान निकष लावले जात नाहीत, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही.” तसेच, स्थानिक मराठी हॉकर्सवर अन्याय होऊ दिला जाणार नाही आणि त्यांच्या हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठामपणे पाठीशी उभी राहील, अशी ग्वाहीही यावेळी देण्यात आली.

खोटे नगर ते कालिका माता मंदिर परिसरातील सर्व अतिक्रमणांचे समान निकषांवर पुनरावलोकन करण्यात यावे, तसेच परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून होणारे बेकायदेशीर अतिक्रमण तातडीने हटवावे, अशी मागणी करत मनसेने प्रशासनाला कठोर शब्दांत इशारा दिला आहे.

दरम्यान, प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि गरज पडल्यास अतिक्रमण हटविण्याची कारवाई जनतेच्या सहकार्याने स्वतः हाती घेण्यात येईल, असा ,स्पष्ट इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे,
उप महानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, उप महानगराध्यक्ष ललित शर्मा, चेतन पवार, प्रकाश जोशी, आशुतोष जाधव, राहुल चव्हाण, खुशाल ठाकूर, बादशहा शहा, अल्ताफ शहा,महिला सेनेच्या अनिता कापुरे,भूषण ठाकूर, हेमंत मराठी, यश पाटील, गोपाल कोळी, शुभम काळे, चिराग लोखंडे, चुनेस अत्तरदे, सोनू निमाडकर, ऋषी पाटील, साई पाटील, गौरव पाटील, दर्शन पाटील, पंकज बोरसे, रोहित कोळी, आदित्य गायकवाड, राहुल सोनवणे, पियुष जहा, धीरज काळे, श्याम मराठे, माया मराठे, अन्याय झालेले मराठी हॉकर्स उपस्थित होते,

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonmanse

Related Posts

जळगाव

टहाकळी येथील बालिकेच्या मृत्यूप्रकरणी खडसेंचा जाब; प्रशासनाकडून चौकशी सुरू

July 10, 2026
जळगाव

जळगावमधील कुपोषण मुद्यावर खडसेंनी उपस्थित केला प्रश्न; कुपोषणाचे प्रमाण घटल्याचा प्रशासनाचा दावा

July 10, 2026
धरणगाव

धरणगाव येथे सहारा बहुद्देशीय संस्था तर्फे माजी नगराध्यक्ष निलेशभाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण संपन्न!

July 10, 2026
जळगाव

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळा आनोरे येथे मोफत गणवेश वाटप….!

July 10, 2026
जळगाव

घरफोडी, दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश

July 10, 2026
धरणगाव

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

July 9, 2026
Next Post

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाकूचा धाक दाखवून लुटले : दोन आरोपींना अटक !

November 24, 2020

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार १८ नोव्हेंबर २०२२ !

November 18, 2022

टेक्नॉलॉजी इनोव्हेशन कंपनी ‘मोबिल’चा अभिनेता हृतिक रोशन नवीन ब्रँड अॅम्बेसेडर !

May 31, 2023

बोदवड तहसिल कार्यालयासमोर एकाने रचली स्वतःची चिता ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

September 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group