नशिराबाद (सुनिल महाजन) आज नशिराबाद टोल प्लाझा येथील कामगारांना कामावरून कमी करण्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना व टोल प्लाझा कामगारांनी काम बंदचा पवित्रा घेतला असून आंदोलन पुकारले आहे.
संबंधित टोल प्लाझा प्रशासन कामगारांना तुच्छ वागणूक देते. नियमानुसार पगार देत नसून कामगारांना कुठल्याही प्रकारच्या भत्ता किंवा सुविधा तसेच कुठले प्रकारचा संरक्षणार्थ योजना देत नसून संबंधित कर्मचारी व प्रशासनाकडे न्याय मागण्यास गेले असता प्रशासनाने त्यांच्यावर सूड भावनेने बेकायदेशीररित्या शो क्लोज नोटीस, कारणे दाखवा नोटीस किंवा टर्मिनेशन ऑर्डर न करता डायरेक्ट कामावरून कमी करून टाकले. नवीन कामगार भरती त्या ठिकाणी करून घेतली. अशा मनमानी कारभाराच्या विरोधात टोल प्लाजा वरील सर्व जुने कामगार यांना नाईलाजास्तव काम बंदचा पवित्रा घ्यावा लागला. संबंधित ठेकेदार असशील भाषेत शिवीगाळ करतात तसेच खालच्या भाषेत बोलणे, पगार वेळेवर न देणे, कुठल्याही प्रकारचा भत्ता न देणे, तसेच दादागिरीची भाषा करतात त्याच्या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना व कामगार यांनी आंदोलन पुकारले आहे. तरी जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहील.
आंदोलनामध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, शहराध्यक्ष जितेंद्र बराटे, शहर सचिन भालेराव, गोकुळ धनगर, सचिन भालेराव, गजेंद्र माळी, केतन बॉंडे, समाधान सोळुंके, गजानन मराठे, कार्तिक असेंरी, लोकेश लोखंडे, मयूर झटके, दीपक जंगम, गिरीश चौधरी, भावेश रोटे, पुरसोत्तम कोल्हे, योगेश रोटे, दीपक येवले, जयेश जंगम, प्रवीण माळी, दशरथ पाटील, वसीम शेख, प्रीतम चौधरी, सागर सोनवणे, हर्शल रोकडे, दिनेश रंधे, पुष्पक वंजारी आदी उपस्थित होते.
















