जळगाव (प्रतिनिधी) शासनातर्फे वीज विभागाचे खाजगीकरण करण्याचा जो घाट शासनाचा सुरू आहे त्याच्या विरोधात संघर्ष समिती महाराष्ट्रभर आंदोलन करीत आहे.या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा द्यावा याकरता म्हणून संघर्ष समितीचे पदाधिकारी यांनी मनसे जिल्हाध्यक्ष यांची भेट घेतली व वीज वितरण विभागाचे खाजगीकरण हा अन्याय आहे, या बाबत सविस्तर माहिती दिली.
दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व महाराष्ट्र नवनिर्माण वीज सेने चे अध्यक्ष श्री शिरीष सावंत साहेब यांच्यासोबत संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांचे बोलणं करून दिले.श्री सावंत साहेब यांनी सदर आंदोलनाला पाठिंबा द्यावा याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानुसार पक्षाचे जळगाव जिल्हा निरीक्षक श्री विनय भोईटे साहेब त्यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समिती यांना जळगाव जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जाहीर पाठिंबा देत असल्याची माहिती मनुष्याचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.