धरणगाव (प्रतिनिधी) एरंडोल तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ४२ वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अशोक सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की दि. ३ मे २०२२ रोजी अशोक सोनवणे हा ४२ वर्षीय महिलेच्या घरी येत तू माझ्या विरुद्ध तक्रार देणार होती. या कारणावरुन महिलेचा हात पकडून चापटा बुक्यांनी मारहाण केली. तसेच त्याच्या बोलण्यामुळे पिडीत महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अशोक सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकाँ अरुण निकुंभ करीत हे आहेत.