जळगाव (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
या संदर्भात पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित आरोपी हा १४ फेब्रुवारी ते ६ मार्च पावेतो नेहमी पाठलाग करत होता. तसेच अधून मधून रात्री बेरात्री अश्लील चॅटींग करत असतो. लग्न कर असे म्हणत असतो. लग्न नाही केले तर वडीलांना मारेल अशी मुलीस धमकी देत असतो, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.उप निरी. प्रिया रमेश ह्या करीत आहेत.