भडगाव : प्रतिनिधी
शहरातील एका ३३ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी एका विरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरात राहणाऱ्या ३३ वर्षीय विवाहितेचा फोटो संशयित आरोपी भूषण मनोहर पाटील याने मोबाईलला स्टेट्स ठेवल्याचा जाब विचारायला गेलेल्या महिलेला शिवीगाळ करीत हात धरून तु मला आवडते, तुझा चेहरा माझ्या डोळ्यासमोर दिसतो असे म्हणून लज्जा उत्पन होईल असे कृत्य केल्या प्रकरणी भडगाव पोलिसात महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी भूषण मनोहर पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.फौ.कैलास गीते हे करीत आहेत.
















