धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात अश्लिल शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, दि. १२ मे रोजी पिडीत महिला ही कूलरमध्ये पाणी भरत असतांना शिवाजी नारायण सोनवणे आणि विनोद भास्कर सोनवणे हे जोरजोरात शिवीगाळ करत होते. याबाबत पिडीत महिलेने दोघांना विचारले की, तुम्ही कुणाला शिवीगाळ करत आहात?. त्यावर दोघांनी पिडीतेला अश्लिल शिवीगाळ करत मनात लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. तसेच पिडीतेला चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी शिवाजी सोनवणे आणि विनोद सोनवणे या दोघांविरुद्ध भादवि कलम ३५४,२९४,३२३,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहकॉ खुशाल पाटील हे करत आहेत.