जळगाव (प्रतिनिधी) माध्यम क्षेत्रातील अध्यापकांनी स्थापन केलेल्या मीडिया एज्युकेटर्स असोशिएशन ऑफ महाराष्ट्र (मीम) या राज्यव्यापी संघटनेतर्फे एबीपी माझ्या या वृत्तवाहिनीच्या सुप्रसिद्ध वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम यांच्या व्याख्यानाचे आयोजन सोमवार दि. ५ जुलै २० २१ रोजी करण्यात आले आहे. “काय सांगशील ज्ञानदा – महिला आणि प्रसार माध्यमे” असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. सोमवार दि. ५ जुलै रोजी दुपारी बारा वाजता ऑनलाईन स्वरुपात हा कार्यक्रम होईल, अशी माहिती अध्यक्ष डॉ. सुधीर भटकर यांनी दिली.
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयातील माध्यम शिक्षक व माध्यम विद्यार्थ्यांसाठी मीडिया एज्युकेटर्स असोशिएशन ऑफ महाराष्ट्र (मीम) ही संघटना स्थापन करण्यात आली आहे. या संघटनेतर्फे विविध उपक्रमांसह माध्यम क्षेत्रातील विद्यार्थांच्या विकासासाठी तज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत एबीपी माझ्या या वृत्तवाहिनीच्या प्रख्यात वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम या “काय सांगशील ज्ञानदा” या शीर्षकाखाली “महिला आणि प्रसार माध्यमे” या विषयावर माध्यम क्षेत्रातील प्रेरक अनुभव कथन करणार आहेत. फेसबुक व यू ट्यूबद्दारे याचे प्रसारण होणार आहे . फेसबुक लाईव्ह (लिंक – http://tiny.cc/FB_DnyanadaKadamLive) व यू-ट्यूब लाईव्ह (लिंक-http://tiny.cc/YouTube_DnyanadaKadamLive) द्वारे हा कार्यक्रम सर्वाना पाहता येईल.
या उपक्रमात चांगले प्रश्न विचारणाऱ्या दोन विद्यार्थिनीना ज्ञानदा कदम यांच्यावतीने पारितोषिके दिली जाणार आहेत. माध्यम शिक्षक व माध्यम विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मीडिया एज्युकेटर्स असोशिएशन ऑफ महाराष्ट्र (मीम)चे अध्यक्ष डॉ. सुधीर भटकर, कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र चिंचोलकर, उपाध्यक्ष डॉ. सुंदर राजदीप यांच्यासह संघटनेचे सचिव डॉ. विनोद निताळे, सहसचिव डॉ. शाहेद शेख, कोषाध्यक्ष डॉ. रोहित कसबे, कार्यकारिणी सदस्य डॉ. कुमार बोबडे, डॉ. मोईज हक, डॉ. संजय तांबट, डॉ. मंजुला श्रीनिवास, डॉ. मीरा देसाई, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. सुहास पाठक यांनी केले आहे.