जळगाव प्रतिनिधी : दोन पुरुषांचा आपसातील अश्लील व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याकडून ३१ हजार रुपये उकळले. हा धक्कादायक प्रकार दि. २५ फेब्रुवारी रोजी भुसावळ येथे घडला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाईलमधील एक अॅप डाऊनलोड केल्यानंतर ३६ वर्षीय रेल्वे कर्मचारी व अन्य एकाची ओळख झाली. त्यानंतर तिसऱ्या व्यक्तीने दोघांचा अश्लील व्हिडिओ तयार केला. तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. यात वेळोवेळी कर्मचाऱ्याकडून ३१ हजार रुपये ऑनलाईन स्वीकारले. त्यानंतरही अधिक पैशाची मागणी सुरूच ठेवली. या प्रकरणी रेल्वे कर्मचाऱ्याने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून धमकी देऊन पैसे उकळणाऱ्या चार जणांविरुद्ध खंडणी व आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.















