नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) दहावा हप्ता मिळणार आहे. मोदी सरकार नोंदणीकृत बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहे. पण काही वेळा छोट्याशा चुकीमुळे पैसे मिळत नाहीत. तुम्हीही या चुका वेळीच सुधारा. शेतकऱ्याला विसरूनही ही चूक करू नका. तुमचे बँक खाते E-Kyc करून घ्या कारण याशिवाय तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होणार नाहीत.
सरकारने शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे सांगितले की नरेंद्र मोदी सरकार १ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १२ वाजता पीएम किसान योजनेअंतर्गत १० वा हप्ता जारी करेल. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना मोदी सरकारने अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना लक्षात घेऊन सुरू केली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ६,००० रुपयांची आर्थिक मदत एका वर्षात ३ हप्त्यांमध्ये दिली जाते. दर ४ महिन्यांनी शेतकर्यांच्या खात्यात २,००० ट्रान्सफर केले जाते
शेतकऱ्यांना आधार E-KYC घेणे आवश्यक आहे
सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी आधार ई-केवायसी अनिवार्य केले आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना त्यांचा १० वा हप्ता मिळणार नाही. पोर्टलवर असे सांगण्यात आले आहे की आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांना किसान कॉर्नरमधील ई-केवायसी पर्यायावर क्लिक करावे लागेल. बायोमेट्रिक ऑफलाइन प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्राला भेट द्यावी लागेल. हे काम तुमच्या मोबाईल, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरूनही घरी बसून करता येते.
कशी कराल ई-केवायसी
१. पहिल्यांदा पीएम किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जा.
२. उजव्या हाताला, होमपेजमध्ये खालील बाजूला, तुम्हाला फार्मर्स कॉर्नर दिसेल.
३. तिथे फार्मर्स कॉर्नरच्या अगदी खाली एक बॉक्स आहे, तिथे ई-केवायसी म्हटले आहे.
४. ई-केवायसीवर क्लिक करा.
५. त्यानंतर आधार ईकेवायीसची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक पेज ओपन होईल.
६. आता तुम्ही त्यात तुमचा आधार क्रमांक भरा आणि त्यानंतर कॅप्चा कोड भरा आणि त्यानंतर सर्च बटनावर क्लिक करा.
७. यानंतर तुम्हाला तुमच्या आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर टाकावा लागेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला ओटीपी येईल.
८. हा ओटीपी तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर येईल.
९. तो ओटीपी भरा आणि ऑथेंटिकेशनसाठी सब्मिट बटणावर क्लिक करा.
१०. तुम्ही ऑथेंटिकेशनसाठी सब्मिट बटणावर क्लिक केल्याबरोबर तुमची पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होईल.