चोपडा (प्रतिनिधी) धुळे येथून चोरीस गेलेल्या मोटर सायकल चोरट्यास चोपड़ा भागातून स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने ताब्यात घेतले आहे. तसेच चोरट्याला मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील तपास कामी धुळे तालुका पोलीस स्टेशन पथकाच्या ताब्यात दिले.
याबाबत वृत्त असे की, आरोपी शशिकांत ताराचंद बविस्कर (वय २१) रा. चौगांव ता. चोपड़ा या आरोपीने धुळे येथून मोटार सायकल चोरी केली. त्यानंतर धुळे तालुका पोलीस स्थानकात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच २८ फेब्रुवारी २०२१ रोजी सदर गुह्यातील चोरीस गेलेल्या मोटर सायकल चोपड़ा भागात फिरवत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील किरण कुमार बकाले यांना मिळाल्याने त्यांनी पथकास पाठवून त्यास ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार त्यास मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील तपास कामी धुळे तालुका स्टेशन पथकाच्या ताब्यात दिले.
स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने केली कारवाई
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील पथकातील पो हे कॉ रवींद्र गायकवाड, पो हे कॉ अनिल देशमुख, पो हे कॉ कमलाकर बागुल, पो हे कॉ सुरज पाटील, पो हे कॉ प्रदीप पाटील, चालक -पो ना भरत पाटील, पो कॉ परेश महाजन यांनी कारवाई करत शशिकांत ताराचंद बविस्कर याला चोपडा येथून अटक केले.