TheClearNews.Com
Wednesday, September 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महा कृषी ऊर्जा अभियानास शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊतांनी मानले शेतकऱ्यांचे आभार

The Clear News Desk by The Clear News Desk
March 1, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या नवीन कृषिपंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये जाहीर झालेल्या या धोरणात थकबाकी भरण्यासाठी महा कृषी ऊर्जा अभियानांतर्गत विविध सवलती जाहीर झाल्यापासून राज्यात ४ लाख २१ हजार ७८९ शेतकऱ्यांनी थकबाकीपोटी ३६८ कोटी २२ लाख रुपये आजपर्यंत भरले आहेत. तर जळगाव परिमंडलातील २६ हजार ३६४ शेतकऱ्यांनी २४ कोटी ७६ लाखांचा भरणा केला आहे.

या अभियानास मिळत असलेला प्रतिसाद सतत वाढत असून थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्यांचे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आभार मानले आहेत. तसेच सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांनी या अभियानाचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. या अभियानात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांकडील सुमारे १५ हजार कोटींची थकबाकी माफ करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. हे अभियान तीन वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी थकबाकी भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांच्या सुधारित मूळ थकबाकीवर ५० टक्के सवलत मिळणार असून व्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. अशाप्रकारे पहिल्या वर्षी संपूर्ण थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना जवळपास ६६ टक्के सवलत मिळणार आहे. दोन वर्षात थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या सुधारित मूळ थकबाकीवर ३० टक्के तर तीन वर्षात थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या मूळ थकबाकीवर २० टक्के सवलत मिळणार आहे. या अभियानाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील सर्व व्याज व विलंब आकार माफ होणार आहे. तसेच सप्टेंबर २०१५ नंतरच्या थकबाकीवरील विलंब आकार पूर्णपणे माफ होणार आहे. महावितरणने घेतलेल्या कर्जावरील व्याजाच्या सरासरी दराने थकबाकीवर व्याज आकारण्यात येणार आहे.

READ ALSO

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

या अभियानात महावितरणच्या जळगाव परिमंडलांतर्गत धुळे जिल्ह्यातील १० हजार ३९१ शेतकऱ्यांनी ६ कोटी १० लाख, जळगाव जिल्ह्यातील ११ हजार २७ शेतकऱ्यांनी १२ कोटी ८१ लाख, तर नंदुरबार जिल्ह्यातील ४ हजार ९७६ शेतकऱ्यांनी ५ कोटी ८५ लाख रुपयांची थकीत वीजबिले भरली आहेत. गावातून वसूल झालेल्या थकबाकीपैकी ३३ टक्के रक्कम त्याच गावच्या वीजपुरवठाविषयक पायाभूत सुविधांवर खर्च होणार आहे. अधिक गावांचा समावेश असलेल्या सर्कलमध्ये होणाऱ्या थकबाकी वसुलीपैकी ३३ टक्के रक्कम त्याच सर्कलच्या वीजपुरवठाविषयक पायाभूत सुविधावर खर्च करण्याची अतिशय महत्त्वाची तरतूद या धोरणात आहे. पुढील ३ वर्षांत शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीज पुरवठा करण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
Next Post

जिल्हास्तरीय ऑनलाईन लोकशाही दिनी १४ अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तरुणाच्या खून प्रकरणी एकाच परिवारातील पाच जणांना जन्मठेप !

November 7, 2020

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, बुधवार २१ सप्टेंबर २०२२ !

September 21, 2022

वाराणसीत गर्दीचा महापूर ; व्हिडिओ शेअर करत माजी आयएएस अधिकाऱ्यानं काढला भाजपला चिमटा (व्हिडीओ)

March 1, 2022

चाळीसगाव : भीषण अपघात, दोन महिला ठार ; १४ मजूर जखमी !

March 21, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group