मुक्ताईनगर (प्रतिनिधी) येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी अत्यावश्यक औषधी खासदार रक्षाताई खडसे यांच्याकडून स्वखर्चाने पुरविण्यात आल्या आहे. तसेच खासदार रक्षाताई खडसे यांनी कोविड सेंटरमधील रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून उपलब्ध सुविधा व समस्यांची तसेच ऑक्सिजन सुविधेची माहिती घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश राणे यांना योग्य त्या सूचना केल्या.
यावेळी तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे, तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाने, तालुका उपाध्यक्ष मोहन महाजन, भाजयुमो विधानसभा क्षेत्र प्रमुख दत्ता पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, नगरसेवक ललित महाजन, नगरसेवक पियुष महाजन, नगरसेवक मुकेश वानखेडे, प.स.सदस्य राजेंद्र सवळे, विनोद पाटील, सचिन पाटील, पवन पाटील आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.