जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी (एएसओ) परीक्षेत जळगाव शहरातील विशाल सुनील चौधरी यांनी 302 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. एमपीएससीने आज (बुधवार) निकाल जाहीर झाला केला.
एसटीआय आणि एएसओ परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर झाले. विशाल सुनील चौधरी यांनी 302 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्याचप्रमाणे राज्यात कर निरीक्षक (एसटीआय) या परीक्षेत ओबीसी प्रवर्गामध्ये 8 वा क्रमांक मिळाला आहे. विशाल हे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील निमगाव येथे तलाठी म्हणून तीन वर्षांपासून कार्यरत आहेत. तर विशाल यांचे वडील सुनील भाऊराव चौधरी पोलिस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे येथे पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. घरीच वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करत विशाल यांनी हे यश मिळविले आहे.