TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुक्ताईनगर बनावट देशी दारू कारखाना कारवाई ; मद्य तस्करांच्या टोळीचे आंतरराज्यीय कनेक्शन !

धरणगावनंतर मुक्ताईनगरातही बनावट देशी दारू कारखान्याची सेम मोडस ऑपरेंडी !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 23, 2022
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील रूईखेडाजवळ बनावट देशी दारू बनवणार्‍या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकत तिघांना ताब्यात घेतले आहे. तर मूख्य सूत्रधारासह दोघे पसार झाले आहेत. मंगळवारी मध्यरात्री रेकी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, अटकेतील संशयीतांना भुसावळ न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

17 लाख 43 हजार 36 रुपयांचा मुद्देमाल जप्त
मुक्ताईनगर तालुक्यातील रूईखेडा येथे बनावट देशी दारू तयार केली जात असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना मिळाल्याने गेल्या दोन दिवसांपासून रेकी सुरू करण्यात आली. मंगळवारी रात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक जितेंद्र गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकार्‍यांच्या पथकाने अचानक जाऊन छापा टाकत दिडशे बॉक्समधील तयार दारू, रीकाम्या बाटल्या, बूच आदी मिळून 17 लाख 43 हजार 36 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पाच संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली तर मुख्य सुत्रधारासह दोघे पसार झाले आहेत.
यांच्या पथकाने केली कारवाई
विभागीय उपायुक्त अर्जून ओहोळ, अधीक्षक जितेंद्र गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय निरीक्षक सुजीत कपाटे, निरीक्षक सी.एच.पाटील, राजेश सोनार, सतीश पाटील, शिवनाथ भगत, सोमनाथ शेलार, भरारी पथकाचे आनंदा पाटील, अमोद भडांगे (पूरनाड), विपूल राजपूत, सागर देशमुख, विजय परदेशी, मुकेश पाटील, नरेद्र पाटील, नंदू नन्नवरे, धनसिंग पावरा, दिनेश पाटील, रघुनाथ सोनवणे, विठ्ठल हटकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

READ ALSO

बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या पर्समधून दागिने लंपास

धरणगावातही आंतरराज्यीय टोळीचा सहभाग झाला होता उघड !
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धरणगाव येथील बनावट मद्य निर्मिती प्रकरणी अटक केलेल्या आरोपींपैकी ‘मास्टर माइंड’ असलेल्या गौतम माळीचे साथीदार जिल्हा व राज्याबाहेरचे होते. एवढेच नव्हे तर, गुन्हयाची व्याप्ती मोठी होती. अगदी यात आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असल्याचे तपासात समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. यावेळी पोलीस तपासात , बनावट मद्याच्या गुन्ह्याची व्याप्ती ही मोठी असून आंतरराज्यीय टोळीचा यात समावेश असल्याचे तपास समोर आहे. दरम्यान, यानिमित्ताने जिल्ह्यातील बनावट दारू प्रकरण धरणगावपासून सुरु झाल्यानंतर थेट गुजरातसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात पोहचल्याचे दिसून येत होते. परंतू आता धरणगावनंतर जळगाव जिल्ह्यातीलच मुक्ताईनगरमध्ये पुन्हा एकदा देशी दारूचा बनावट कारखाना सुरु असल्याचे समोर आल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

जिल्ह्यात बनावट देशी दारू कारखान्याची सेम मोडस ऑपरेंडी !
धरणगावात दोन वर्षापासून बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरु होता. परंतू स्थानिक पातळीवर हे बनावट मद्य विकले जात नव्हते. त्यामुळे गावात पाहिजे तशी चर्चा होत नव्हती. परंतू अनेक महिन्यांपासून बनावट मद्य कारखान्याबाबत उत्पादन शुल्क विभागाला टीप दिली जात होती. यामुळे धंदा करणे कठीण झाले होते. यानंतर पाण्याच्या जारच्या नावाखाली बनावट दारूचा उद्योग सुरु ठेवण्याची शक्कल लढवण्यात आली. शेवटी एकेदिवशी हा धंदा उघड झालाच. आता मुक्ताईनगरमध्येही बनावट देशी दारू कारखान्याची सेम मोडस ऑपरेंडी समोर आली आहे. कारण याठिकाणी पोल्ट्री फार्मच्या मागे हा गोरख धंदा सुरु असल्याचे उघड झाले आहे. थोडक्यात धरणगावात पाण्याच्या जारच्या नावाखाली तर मुक्ताईनगरमध्ये ‘पोल्ट्री फार्म’च्या मागे बनावट देशी दारूचा कारखाना उघड झाल्यामुळे दोघं ठिकाणी गुन्ह्याची सेम मोडस ऑपरेंडी दिसून येत आहे. आता फक्त यात ‘धरणगाव कनेक्शन’ उघड झाले नाही म्तहणजे मिळवले. कनेक्शन उघड झाले तर मात्र, पुन्हा एकदा साखळी उघड झाल्याशिवाय राहणार नाही, असे बोलले जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

July 21, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या पर्समधून दागिने लंपास

July 21, 2026
गुन्हे

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

July 20, 2026
गुन्हे

क्लास चालकाची ७ लाखात फसवणूक

July 20, 2026
गुन्हे

गुंतवणुकीवर मोठ्या नफ्याचे अमिष दाखवत निवृत्त बँक अधिकाऱ्याला साडेसात लाखांचा गंडा

July 19, 2026
गुन्हे

लिंकला क्लिक करताच व्यावसायिकाचा मोबाईल हॅक

July 18, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, गुरुवार २४ नोव्हेंबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा दूध संघातील दाव्यांवर खंडपीठात याचिका दाखल ; उद्या होणार सुनावणी !

August 25, 2022

भोकर येथे 105 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी ; 34 रुग्ण ऑपरेशनसाठी पनवेलला रवाना !

August 2, 2024

वराड बू. येथील अंगणवाडीचा स्लॅब कोसळला ; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली !

July 28, 2023

भयावह : एकाच वेळी बायको आणि नवऱ्याचं शीर धडा वेगळं, हवनकुंडात दिली आहुती ; धक्कादायक कारण आले समोर !

April 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group