मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील उमरा गावातील तरूणाला जुन्या वादातून लोखंडी रॉड आणि तलवारने वार करून जखमी केल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी १ ऑक्टोबर रोजी मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जितालाल उर्फ जितू इसरत चव्हाण वय ३२ रा. उमरा ता. मुक्ताईनगर हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्याान जितालाल चव्हाण याच्या वडीलांना रामचंद्र पुंडलिक चव्हाण आणि विशाल शंकर रोटे यांच्यासह इतरांनी मारहाण केली होती. याकारणावरून जितालाल चव्हाण याने सर्वांशी बोलणे बंद केले होते. या कारणावरून ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता उमरा गावातील सार्वजनिक ठिकाणी संशयित आरोपी रामचंद्र पुंडलिक चव्हाण आणि विशाल शंकर रोटे यांच्यासह इतर ३ ते ४ जणांनी शिवीगाळ करत लोखंडी रॉड व तलवारने डोक्यावर व गुप्तागास वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी जितालाल चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रामचंद्र पुंडलिक चव्हाण आणि विशाल शंकर रोटे व इतर ३ ते ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















