जळगाव (प्रतिनिधी) पिंप्राळा परिसर म्हणजे जळगावचे उपनगर येथील लोकसंख्या जवळपास ७०/८० हजार आहे. दादवाडी, खोटे नगर, आहुजा नगर, बिबा नगर, असा मोठा परिसर याला जोडला गेला आहे. शासकीय नियमानुसार ५० हजार लोकसंख्या वस्तीत एक रुग्णालय असावे. याबाबत मनसे तर्फे उपमहापौर कुलभूषण पाटील यांना आज निवेदन देण्यात आले.
यावेळी मनसे शहरउपाध्यक्ष संदिप पाटील, रुषी पाटील, दिपक पाटील, कौस्तुभ पाटील, संदिप पाटील, आकाश बागुल, संजय जोगी, महेश सुंर्यवंशी, महेंद्रसिंग राजपुत आदी उपस्थित होते.