TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने शेतकर्‍यांच्या खात्यात नुकसान भरपाई !

कॅबिनेट मंत्री गुलाबभाऊंची वचनपूर्ती : तब्बल ३३४ कोटी रूपयांचा मिळाली मदत

The Clear News Desk by The Clear News Desk
September 3, 2022
in जळगाव, जळगाव, धरणगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : हवामानावर आधारीत फळपिक विमा काढलेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी येणार्‍या विलंबाची दखल घेऊन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांसह कृषी व विमा कंपनीच्या अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली होती. यात शुक्रवारपर्यंत जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये हवामानावर आधारित फळपीक विम्याची तब्बल ३३४ कोटी ७० लक्ष रूपयांची रक्कम जमा होणार असल्याचे विमा कंपनीतर्फे सांगण्यात आले होते. यानुसार जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईच्या स्वरूपातील ही रक्कम जमा झाल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे. तर, ना. गुलाबराव पाटील यांनी शेतकर्‍यांना दिलेले वचन पाळल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, गत मंगळवारी हवामानावर आधारीत फळपिक विमा ज्या शेतकर्यांनी काढला आहे. याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, विमा कंपनीचे प्रतिनिधी कुंदन बारी यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

याप्रसंगी खरीप पीक विमा योजनेत अनेक शेतकर्यांच्या खात्यावर रक्कम पडण्यास अडचणी येत असल्याने, याबाबत पीक विमा कंपनीसोबत चर्चा करून शेतकर्‍यांच्या अडचणी सोडविण्या बाबत निर्देश गुलाबराव पाटील यांनी दिले होते. यासह हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेतर्ंगत जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकर्‍यांना नुकसानभरपाईपोटी ३७५ कोटी रुपयांची रक्कम मंजूर झाली असून, इतर जिल्ह्यांमधील शेतकर्‍यांना ती रक्कम मिळाली असली तरी जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अद्याप का मिळाली नाही ? याबाबत ना. गुलाबराव पाटील यांनी विचारणा केली होती. या अनुषंगाने, संबंधीत बैठकीत पीक विमा कंपनीच्या प्रतिनीधींसोबत चर्चा केल्यानंतर, ही रक्कम शुक्रवारपर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्या संदर्भात विमा कंपनी च्या अधिकाऱ्यांना ना.गुलाबराव पाटील यांनी तंबी दिली होती.

या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील हवामानावर आधारित फळपीक विम्याच्या अंतर्गत नुकसान भरपाईच्या स्वरूपात शेतकर्‍यांना ३३४ कोटी ७० लक्ष रूपयांची रक्कम ही शेतकर्‍यांच्या थेट खात्यात जमा करण्यात आली आहे. यामुळे ना. गुलाबराव पाटील यांनी शेतकर्‍यांना दिलेला शब्द पाळला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी मंत्री गुलाबभाऊंचे आभार मानून समाधान व्यक्त करीत आहे.

भोकर वासीयांनी मानले गुलाबभाऊंचे आभार !

केळी पीक विमा प्रति हेक्टरी 70 हजार मदत मिळाल्याने शेतकरी बांधव आनंदित झाले असून आज जळगाव ग्रामीण येथील शेतकऱ्यांनी पाळधी येथील निवासस्थानी कॅबिनेटमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचा सत्कार करून आभार मानले या वेळी बालाशेठ राठी, प्रमोद सोनवणे, धनराज पाटील, राजेंद्र सोनवणे, सरपंच अरुण सोनवणे, उपसरपंच रवींद्र सोनवणे, वि. का. सोसायटी चेअरमन श्रीराम सोनवणे, अशोक पाटील, लोटन दाजी, दीपक पाटील, सुभाष आप्पा, आधार बापूजी, अनिल भागवत, भीमराव सोनवणे, अनिल सोनवणे., रवींद्र बाबुराव, संजय सोनवणे, भागवत सोनवणे, दोनगावचे सरपंच भागवत पाटील, हितेंद्र आगीवाल यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान, तालुकानिहाय शेतकर्‍यांना मिळालेली नुकसान भरपाई ही पुढीलप्रमाणे आहे. अमळनेर- ५ कोटी ९८ लक्ष; भडगाव-२ कोटी ८६ लक्ष रूपये; भुसावळ ४ कोटी ६६ लक्ष; बोदवड ४ कोटी ८७ लक्ष; चाळीसगाव १ कोटी ०२ लक्ष; चोपडा ४२ कोटी ७१ लक्ष; धरणगाव ६ कोटी ३४ लक्ष; एरंडोल ३ कोटी ७२ लक्ष; जळगाव ३४ कोटी ८२ लक्ष; जामनेर १०० कोटी ५५ लक्ष; मुक्ताईनगर ३९ कोटी ३९ लक्ष; पाचोरा २ कोटी ९८ लक्ष; पारोळा ९२ लक्ष ९६ हजार; रावेर १२० कोटी ९२ लक्ष आणि यावल ६३ कोटी १६ लक्ष रूपये.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

विज्ञान प्रदर्शन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना दिशा देणारे व्यासपीठ : गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

LIC च्या ह्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून मिळवा लाखोंचा नफा !

July 4, 2022

चुंचाळे येथे ३० वर्षीय विवाहितेची गळफास घेवुन आत्महत्या

November 25, 2020

धरणगाव येथे सामाजिक कार्यकर्ते विलास पवार यांचा गौरव

February 6, 2021

चंद्रकांत गवळी जळगावचे नवे अपर पोलीस अधीक्षक ; भाग्यश्री नवटके यांची बदली !

October 1, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group