पाचोरा (प्रतिनिधी) दुचाकीला कट लागल्याच्या वादानंतर तरुणाचा भोसकून खून करण्यात आल्याच्या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. भूषण नाना शेवरे (२३,रा. दुर्गा नगर, पाचोरा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
शहरातील पुनगाव रोडवरील बुऱ्हाणी शाळेसमोर रविवारी संध्याकाळी तरुणांच्या दोन गटात दुचाकीचा कट लागल्याच्या किरकोळ वादातून हाणामारी झाली. यात भूषण शेवरे याच्यावर चॉपरने वार करण्यात आले. यात गंभीर जखमी झालेल्या भूषणला जळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखाल करण्यात आले. परंतू रात्रीच त्याचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सनी रवींद्र देवकर (रा.गाडगेबाबा नगर, पाचोरा) याच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात सोमवारी पहाटे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलासून पोलिसांनी तात्काळ पाचही संशयितांना ताब्यात घेतले आहे.