नाशिक (वृत्तसंस्था) गॅरेजमध्ये काम करतांना किरकोळ वादातून मालकाची डोक्यात पाना घालून निर्घृण हत्या करणाऱ्या कारागिराला पोलिसांनी अवघ्या पाच तासात अटक केली आहे.
नाशिकमधील इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गॅरेज चालविणारे रामचंद्र निषाद यांची डोक्यात लोखंडी पाना घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह इंदिरानगर पोलीस पथक आरोपीचा शोध घेत होते. निषाद यांच्याकडे काम करणारा कारागीर रोशन कोटकर याच्यावर पोलिसांचा संशय होता. कारण, रोशनचे मालक रामचंद्र निषाद यांच्यासोबत काही किकोळ कारणावरुन वादही झालेले होते. पोलिसांनी लागलीच कोटकर आणि त्याचा साथीदार महेश लभडे याला येवला येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनीच हत्या केल्याची कबुली दिली.