जळगाव (प्रतिनिधी) शहरातील विविध मुस्लिम संघटनांनी कोरोनाचे शासकीय नियम पाळून इदगाह मैदानावर एकत्रित येऊन अल-अक्सा मस्जिदसाठी प्रार्थना करून इस्राईल राष्ट्रपती बेंजामिन नेतानयाहूचा निषेध केला.
विशेष प्रार्थना
सर्व प्रथम कारी जाकिर इशाती यांनी इस्राईलमध्ये असलेल्या किबले अव्वल म्हणजे अकसा मस्जिद साठी प्रार्थना केली. त्यात प्रामुख्याने सर्वशक्तिमान अल्लाह अकसा मस्जिदला पूर्णपणे मुक्त कर, जुलूम करणाऱ्या यहूद्या पासून संरक्षण दे, जे या मशिदीच्या सुरक्षेसाठी अहोरात्र पहारा देत आहेत त्यांना मदत कर, हमास आणि पॅलेस्टाईनच्या तरुणांना व त्यांच्या मुलांच्या प्रयत्नांना यश दे, जे मशिदीच्या संरक्षणार्थ व त्याच्या मुक्तीसाठी शहीद झाले त्यांना स्वर्गात जागा दे, मुस्लिमांचे जीवन, संपत्ती आणि सन्मान यांचे रक्षण कर. निष्पाप मुलांचे सुद्धा सरक्षण कर, सर्वशक्तिमान अल्लाह आमच्या सर्व उपासनाचा स्वीकार कर जगातील सर्व आपत्ती, साथीचा रोग आणि सर्व प्रकारच्या आजारापासून सर्वांचे रक्षण कर, पॅलेस्टाईन व गाजा या ठिकाणी शांती नांदू दे, अशी प्रार्थना करण्यात आली.
निषेध
प्रार्नेत्यानंयाहू याच्या प्रतिमेला लाल शाईने कट मारून निषेध नोंदविला.
यांनी केला निषेध
मानियार बिरादरीचे प्रदेशाध्यक्ष फारुक शेख, कूल जमातीचे सय्यद चाँद, इदगाह ट्रस्टचे अनिस शाह, अल मारक सोशल फाऊंडेशनचे खलील झकाउल्लाह, लकी फाऊंडेशनचे सईद फयाज, एमआयएमचे खाटीक खलील, शिकलगर बिरादरीचे अन्वर खान, वहिदत इस्लामीचे जावेद शेख, अल हिंदचे अल्ताफ शेख, अल खैर, ट्रस्टचे युसुफ शह आदींनी निषेध नोंदविला.