मुंबई (वृत्तसंस्था) शुभेच्छा देण्याइतकं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मन मोठे नसल्याची टीका नारायण राणे यांनी केली. ते पदभार स्विकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शिवसेनेला अंगावर घेण्यासाठीच राणेंना केंद्रात मंत्रिपद देण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. खरं खोटं येणारा काळ सांगेल, पण त्याची झलक राणेंनी पदभार स्वीकारताच दाखवली. राणे म्हणाले, “माझं बऱ्याच प्रमुख नेत्यांनी अभिनंदन केलं, चांगलं काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. शरद पवारांनी फोन करुन अभिनंदनही केलं आणि चांगलं काम करा म्हणून शुभेच्छाही दिल्या पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एवढ्या मोठ्या मनाचा नाही”, असा एकेरी वार राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केला.
शरद पवारांनी दिल्या शुभेच्छा
दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरेवर टीका करताना त्यांनी शुभेच्छा दिल्या नसल्या तरी मला संपूर्ण महाराष्ट्रातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, माझी शपथविधी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी शुभेच्छा दिली असल्याची माहिती यावेळी दिली.
















