चोपडा : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य डायरेक्ट हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनच्या पंचमंडळाच्या महाराष्ट्र कार्यकारणीवर महाराष्ट्राचे सहसचिव सचिन पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील प्रताप विद्या मंदिराचे शिक्षक नरेंद्र महाजन यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडी प्रसंगी संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान आमदार निलेशजी लंके यांच्याशी जळगाव जिल्ह्यातील संघटना वाढी संदर्भात व दौऱ्या संदर्भात चर्चा केली असता त्यांना पुढील भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.