कोल्हापूर (वृत्तसंस्था) एकनाथराव खडसे हे पक्षाला खूप मानतात. तुम्ही मीडियातून बोलू नका अशी विनंती मी त्यांना केली आहे. त्यांनी देखील ते मान्य केले आहे. बाबतीत सर्व काही एक-दोन आठवड्यात सुरळीत होईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी आज चंद्रकांत पाटील यांना खडसेंच्या पक्षांतराविषयी विचारले असत त्यावर, असे काहीही होणार नसल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. तसेच एकनाथ खडसे यांच्याबाबत पक्षात सकारात्मक चर्चा सुरू आहे. एक दोन आठवड्यात सर्व सुरळीत होणार आहे. मी स्वतः नाथाभाऊंशी बोलतो आहे. खडसे हे पक्षाला खूप मानतात. तुम्ही मीडियातून बोलू नका अशी विनंती मी त्यांना केली आहे. त्यांनी देखील ते मान्य केले आहे, असे पाटील म्हणाले. परंतू दुसरीकडे भाजपकडून खडसे यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे समोर येत आहे. खडसे याबाबत अद्याप स्पष्ट बोलले नाहीत. परंतू त्यांच्या पक्षांतराची जोरदार तयारी झाल्याचे बोलले जात आहे. खडसे यांना विधान परिषदेची आमदारकी दिली जाणार आहे. त्यानंतर त्यांना सरकारमध्ये एखादं महत्त्वाचे मंत्रिपद दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे.