
मुंबई (वृत्तसंस्था) काँग्रेसनं कायमच महात्मा गांधींचा वध अश्या शब्दप्रयोगाला आक्षेप घेतलाय आहे. पण महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीलाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून गांधीजींबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले आहे. नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींचा वध केला असल्याचं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे.
काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे मुंबईमध्ये बोलत असताना त्यांनी देशातील पहिला दहशतवादी नाथुराम गोडसेनं आजच्याच दिवशी गांधीजींचा वध केला असं पटोले म्हणाले आहेत. त्यांनी वध हा शब्द वापरल्यानं त्यांच्यावर टीका होत आहे. त्यामुळे नाना पटोलेंच्या तोंडातही गोडसेंची भाषा आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
नाना पटोले यांच्या वक्तव्यावर आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही टीका केली आहे. नटवरलाल नाना पटोलेंवर मानसिक उपचार होणं गरजेचं आहे, त्यांना औषधी पाठवल्या आहेत. त्यांनी उपचार सुरु करावेत. यापुर्वी वध आणि हत्या यावरून राज्यात वाद झाले असताना ते जाणीवपुर्वक वक्तव्य करत असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे.
















