TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव येथे अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय सब-ज्युनिअर बुध्दिबळ स्पर्धा !

२७ डिसेंबर २०२३ ते ४ जानेवारी २०२४ दरम्यान स्पर्धेचे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 23, 2023
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा बुध्दिबळ असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र बुध्दिबळ असोसिएशन व अखिल भारतीय बुध्दिबळ महासंघ यांच्या मान्यतेने जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूलच्या आवारात २७ डिसेंबर २०२३ ते ४ जानेवारी २०२४ या नऊ दिवसांच्या कालावधीत राष्ट्रीय सब-ज्युनिअर (१५ वर्षा आतील मुले व मुलींच्या) बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धा स्विस-लीग प्रकाराने खेळविण्यात येणार असून स्पर्धकांना ११ फेऱ्यात विविध स्पर्धकांशी मुकाबला करावा लागणार आहे.  या संपूर्ण स्पर्धेत एकूण नऊ लाखांची रोख पारितोषिके व वयोगटानुसार प्रथम तीन विजेत्यांना चषक देण्यात येतील तसेच प्रत्येक सहभागी खेळाडूंना पदके देण्यात येतील या संपूर्ण स्पर्धेचे प्रायोजकत्व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. या जळगाव शहरातील सुप्रसिद्ध कंपनीने स्वीकारले आहे हेच नव्हे तर आयोजनामध्ये सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा असणार आहे.

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

या राष्ट्रीय स्पर्धेत जम्मू-काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत भारतातील विविध २५ राज्यातील २१४  मुले व मुलीं खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. त्यात आसामचा कॅन्डीडेड मास्टर मयंक चक्रवर्ती,  – २४०३, तामिळनाडूचा फिडे मास्टर दाक्षिण अरुण,  – २३३२, कॅन्डीडेड मास्टर शेख सुमेर अर्श, तेलंगाना – २२५५, वेस्टबंगालची मृतिका मलीक १९७०, उत्तरप्रदेशची वुमन फिडे मास्टर शुभी गुप्ता, दिल्लीची साची जैन, इत्यादी.. विविध मानांकीत प्राप्त खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. १२८ मुलांपैकी ११४ तर ८६ मुलींनपैकी ७२ फिडे मानांकन प्राप्त खेळाडू असे २१४ स्पर्धक आहेत.

महाराष्ट्र, आसाम, तामिळनाडू, तेलंगाना, राजस्थान, आन्द्रप्रदेश, दिल्ली, वेस्ट बेंगाल, गुजराथ, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, पंजाब, चंडीगड, हरियाणा, केरल, गोवा, उत्तराखंड, झारखंड, उडीसा, त्रिपुरा, ई. २५ राज्या मधून खेळाडू येत आहे.

स्पर्धेसाठी मुख्यपंच कलकत्ता येथील आंतरराष्ट्रीय पंच देवाशीस बरुआ, सहायक पंच पुणे येथील आंतरराष्ट्रीय पंच विनिता श्रोत्री व त्यांना मदतनीस ९ पंच असतील. आपापल्या राज्याच्या संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व खेळाडूंची व संघ प्रशिक्षक अथवा संघ व्यवस्थापक यांची  निवास व्यवस्था जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. द्वारे करण्यात आली आहे.

या राष्ट्रीय स्पर्धेतून सहभागी खेळाडूंना आपले फिडे मानांकन उंचविण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे तसेच ग्रांड मास्टर ही उपाधी मिळविण्यासाठीची वाटचाल या स्पर्धे द्वारे खेळाडूंना मिळणार आहे. या स्पर्धेत प्रथम सहा (६) विजेत्या खेळाडूंची निवड पुढील आंतरराष्ट्रीय/आशियाई स्पर्धांसाठी करण्यात येईल व हे खेळाडू आपल्या भारत देशाचे प्रतिनिधित्व करतील, अशी माहित आजच्या पत्रकार परिषदेत जळगाव जिल्हा बुध्दिबळ असोसिएशनचे अध्यक्ष व स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारलेल्या जैन इरिगेशन कंपनीचे सह-व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी दिली.

या पत्रकार परिषदेत असोशिएशनचे सचिव नंदलाल गादिया, उपाध्यक्ष फारूक शेख, सहसचिव शकील देशपांडे, संजय पाटील, कार्यकारणी सदस्य चंद्रशेखर देशमुख, रवींद्र दशपुत्रे, आर. के. पाटील, विवेक दानी  तसेच जैन स्पोर्ट्स अकादमीचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, प्रवीण ठाकरे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्वानुभावावर आधारीत ग्रीन स्कूल आहे. अनुभूती शाळेची हिरव्यागार, नयनरम्य, १०० एकरच्या परिसरात निर्मिती करण्यात आली आहे. अनुभूती ही एक आगळीवेगळी शाळा आहे. ही शाळा विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्ये आणि समज या बाबतीत सर्वोत्कृष्ट शैक्षणिक अनुभूती प्रदान करण्याचा प्रयत्न करते. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा, भावनिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक बाबींमध्ये वाढ आणि विकासासाठी सर्वोत्तम व्यासपीठ उपलब्ध करते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
Next Post

दुचाकीवरून जाणाऱ्या दोघं मित्रांवर काळाचा घाला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंचोली येथे गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

July 4, 2021

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, १ झाला बरा !

November 25, 2021

‘शीना बोरा जिवंत असून काश्मीरमध्ये आहे’ ; इंद्राणी मुखर्जीचा खळबळजनक दावा

December 16, 2021

खडसेंच्या अडचणीत वाढ ; थेट महिला आयोगाने दिले पोलीस अधीक्षकांना आदेश !

October 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group