मुंबई (वृत्तसंस्था) भाजप आमदार श्वेता महाले (BJP MLA Shweta Mahale) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (NCP leader Nawab Malik) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नवाब मलिकांनी मुंबईत, शिवसेना भवनात (Shiv Sena Bhavan) बॉम्बस्फोट घडवून आणले असून आणि त्याच नवाब मलिकांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) पुढे आले आहेत,असं वादग्रस्त विधान श्वेता महाले यांनी केलं आहे.
नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील हा मुद्दा चर्चेत होता. त्यानंतर आता भाजप आमदार श्वेता महाले यांच्या आरोपांमुळे खळबळ निर्माण झाली आहे. नवाब मलिक यांनीच शिवसेना भवनासह मुंबईत इतर ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा आरोप श्वेता महालेंनी केला आहे. एवढ्यावरच न थांबता पुढे त्या असंही म्हणाल्या की, ज्या मलिकांनी शिवसेनाभवनात बॉम्बस्फोट घडवले, त्याच मलिकांना वाचवण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रयत्न करत असल्याचा आरोप श्वेता महालेंनी केला आहे.
काय म्हणाल्या आमदार श्वेता महाले?
शिवसेनेने त्याच दिवशी हिंदुत्वाला लाथ मारली, जेव्हा ते सत्तेसाठी काँग्रेससोबत गेले. राज्यात एका विशिष्ट विचारधारेच्या लोकांनाच संरक्षण दिलं जातंय. बाळासाहेब ज्या हिंदुत्वादासाठी लढले, तेच उद्धव ठाकरे विसरलेत, शिवसेनेचं हिंदुत्व आता फक्त अंगावर चढवण्यापुरतं राहिलं असं श्वेता महाले म्हणाल्या.