मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी मलिकांची प्रकृती खराब झाल्याची माहिती मिळत आहे.
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या घरांवर सक्तवसुली संचलनालयाने छापे टाकल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. अखेर न्यायालयाने ३ मार्चपर्यंत त्यांना कोठडी सुनावली आहे. ईडीने कोठडी घेण्यापूर्वी मलिकांची वैद्यकीय चाचणी केली होती. यानंतर त्यांना पुन्हा जे.जे. रुग्णालयात चाचणीसाठी आणण्यात आलं. यावेळी मलिकांची प्रकृती खराब झाल्याची माहिती मिळत आहे. मलिक यांना पोटाचा त्रास सुरू झाल्याने चाचणीसाठी वेळ लागला.
मलिकांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना तासाभरात पुन्हा ईडीच्या कोठडीत नेणं अपेक्षित होतं. मात्र, चार तास झाल्यानंतरही त्यांच्या उर्वरित चाचण्या सुरू आहेत. रुग्णालयात त्यांच्या उर्वरित चाचण्या सुरू असून उपचारही पार पडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात ईपीआर जवळच्या पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलाय. यापूर्वीच न्यायालयाने नवाब मलिक यांना ईडीच्या कोठडीत घरचे जेवण मिळण्याची परवानगी दिली होती. तसेच औषधे उपलब्ध करुन देण्यासही परवानगी दिली होती.