जळगाव (प्रतिनिधी) जळगाव मनपाचे नवनिर्वाचीत महापौर सौ. जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांचा जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने (जिल्हाध्यक्ष रा.का.प.) रवींद्र भैय्या पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेवक सुनील महाजन, सौ. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदनाताई चौधरी, सौ. शकीला तडवी, संदीप पाटील, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, अशोक लाडवंजारी, सलीम इनामदार, दिलीप माहेश्वरी, सुनील माळी, अरविंद मानकारी, किरण आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर सौ. जयश्रीताई महाजन, सुनील महाजन यांच्या घरी जावून सत्कार, व उपमहापौर कुलभूषण पाटिल, यांचे समवेत अनेक नगरसेवक मनपाच्या उपमहापौरच्या दालनात जावून सत्कार करण्यात आला. व जळगाव नागरिकांना उत्तम सेवा पूर्वा, खराब रास्ते त्वरित काम सुरु करा, अशी मागणी देखील सदिच्छा भेटी दरम्यान (जिल्हाध्यक्ष रा.क.प) रविन्द्र पाटिल, जिल्हा जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मीडिया प्रमुख सलीम इनामदार यांनी केली आहे.