चोपडा (प्रतिनिधी) शिवसेनेच्या आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या अथक परिश्रमातून हजारो कोटींचे विकासकाम सुरू आहे. त्यात मात्र, येथील राष्ट्रवादी पक्षाच्या मंडळीला विकास काम नको आहे. त्यामुळे ते विकासकामात अडथळा निर्माण करत आहे. अशा विघ्नसंतोषी विरोधकाबाबतीत जनतेत प्रचंड संतापाची लाट आहे. विकास कामाला अडथळा आणू पाहणाऱ्यांची गय केली जाणार नाही. वेळ पडल्यास कायद्याचा बडगा उगारु, असा निर्वाणीचा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांनी आज एका पत्रकार परिषदेतून दिला आहे.
नरेंद्र पाटील पुढे म्हणाले की, विकासाकामासाठी निधी मागणाऱ्याची गर्दि असते. मात्र चोपडा तालुक्यात आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी स्व:ताहून करोडो रुपयांचा निधी आणून जनसेवा बजावत आहे. तसेच तालुक्याच्या विकास काम सर्व खेड्यापाड्यात सुरू आहे. त्यामुळे आमदार लताताई सोनवणे यांची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढु लागल्याने विरोधकांना धडकी भरली आहे. परिणामी वर्डी येथील कोट्यवधी रुपयांचा रस्त्याला अडथळा निर्माण करण्यासाठी विरोधकांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र, आजपर्यंत वर्डीच्या इतिहास प्रथमच रस्त्यासाठी इतका निधी कोणी आमदारानी आणला असेल.
एवढ्या मोठ्या कामाला विरोध करण्याची विरोधाकांची हिंम्मत कशी होते असे? असा सवाल सामान्य जनतेतून होत असल्याचा दावा देखील नरेंद्र पाटील यांनी केला. तीनशे कोटी रुपयांचे काम मंजूर आहेत. हातेड- गलवाळे येथे ही विरोध केला जात आहे. चांदसणी- कमळगाव येथे देखील विरोध केला होता. इतका निधी माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी हे तर नगरविकास मंत्री देखिल होते तेंव्हा आणला नव्हता. फक्त आमदार लताताई सोनवणे आणि माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या दोघाच्या प्रयत्नातून जवळपास पाचशे कामाचे उद्घाटन करणार आहोत. तसेच शंभर कामाचे देखिल उद्घाटन भूमिपूजन झालेले आहे. हाच विकास विरोधकांच्या पोटात दुखत आहे. जेंव्हा पाचशे कामाचे उद्घाटन होईल तेंव्हा कुठे जातील.
सामान्य जनता यांना गावा गावात प्रश्न विचारत असल्याने हे राजकीय स्टंट म्हणून विरोध करत आहेत. यांच्या विरोधाला आम्हीही आमच्या प्रमाणे उत्तर देऊ आणि यांच्या विरोधाला न घाबरता जे काम जेथे मंजूर असेल त्याच ठिकाणी होईल. आणि विरोधच जर करायचे असेल तर विकास कामात विरोध करा आपण ही इतका विकासकाम आणून दाखवावा. मग खरा विरोध होईल. नगरपालिका मार्फत कस्तुरबा विद्यालयापासून तर बायपासपर्यंत झालेल्या रस्त्यांचे कामाची अवस्था बघा. तिथे कोणी कसे बोलत नाही?, असा सवाल देखील नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी उपसभापती एम व्हि पाटील, संचालक विजय पाटील, गोपाल पाटील, राजेंद्र पाटील,नितीन पाटील, कैलास बाविस्कर, नाना आहिरे, शिवाजी कोळी,समाधान देवराज,ज्ञानेश्वर अहिरे, संदीप धनगर, ऍड.शिवाजी पाटील, आदी उपस्थित होते