TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह : अभिषेक पाटील यांच्याकडून दबावतंत्राचा वापर?

The Clear News Desk by The Clear News Desk
September 10, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांनी वारंवार तक्रारी केल्यामुळे राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना राजीनामा द्यायला सांगितला गेला होता. त्यामुळे मला कार्यमुक्त करा किंवा आम्ही सामुहिक राजीनामे देऊ, असे प्रकार म्हणजे एकप्रकारे हा पक्षश्रेष्टींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्याच दुसऱ्या गोटातून आता समोर येत आहे. दुसरीकडे ऑगस्ट महिन्यात राष्ट्रवादी महानगरची कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती, हे विशेष !

 

READ ALSO

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील अंतर्गत कुरबुरींनंतर जयंत पाटील यांनी अभिषेक पाटील यांना महानगराध्यक्ष पदावरून दूर केले होते. अभिषेक पाटील यांच्याबाबत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींवरून त्यांची महानगराध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे नाराज झालेल्या अभिषेक पाटील यांनी पक्षश्रेष्ठींवर दबावतंत्राचा वापर सुरु केला असल्याचेही बोलले जात आहे. अभिषेक पाटील यांनी प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यांना पत्र पाठवत कार्यमुक्त करण्याची मागणी केल्यामुळे ते उलट पक्षालाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न करताय का?, असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. खरं म्हणजे यानिमित्ताने राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

 

काही दिवसांपूर्वी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जिल्ह्यातील नेत्यांची एक महत्वाची बैठक झाली होती. यावेळी उपस्थित अनेक नेत्यांनी अभिषेक पाटील यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. एवढेच नव्हे तर, खडसे गटाचे अशोक लाडवंजारी यांना महानगराध्यक्ष पद देण्याची शिफारस देखील करण्यात आली होती. या बैठकीनंतरच जळगाव महानगराध्यक्ष पदावरून अभिषेक पाटील यांची उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतू अनेक दिवस यावर निर्णय होऊ शकला नव्हता. त्यानंतर गुरुवारी रात्री अचानक राष्ट्रवादीतील घडामोडी वेगाने फिरायला सुरुवात झाली.

 

जळगाव महानगर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची आढावा बैठक २८ ऑगस्टला महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, एजाज मलिक तसेच प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली होती. यावेळी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेली जळगाव महानगरची कार्यकारणी पुर्णपणे बरखास्त करण्यात आली होती. तसेच नवीन कार्यकारणीची घोषणा येत्या काही दिवसात करण्यात येणार होती. परंतू तत्पूर्वीच आता अभिषेक पाटील यांचा राजीनामा झाल्यामुळे आता नवीन महानगराध्यक्ष नियुक्त झाल्यानंतरच नवीन कार्यकारणी जाहीर होईल,हे स्पष्ट झाले आहे.

 

‘मला आता स्वतः; पक्षाचे तळागाळात काम करावयाचे आहे. स्थानिक नेत्यांच्या वारंवार तक्रारीमुळे मी पूर्ण क्षमतेने काम करू शकत नव्हतो. तरी मला वरील संघटनेच्या पदावरून मुक्त करावे. मी सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षात इमाने इतबारे काम करेन,’ असा मजकूर असलेले अभिषेक पाटील यांचे पत्र सोशल मीडियावर पत्र व्हायरल झाले होते. पक्षाअंतर्गत कलहाचा विषय सार्वजनिक झाल्यामुळे पक्षश्रेष्ठी देखील नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे. कारण राष्ट्रवादीला अंतर्गत कलह काही नवीन नाही. विनोद देशमुख यांच्या सारख्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याला तर पक्षाने निलंबित केले होते. परंतू त्यांनी कधीही सोशल मीडियातून त्रागा व्यक्त केला नाही. एवढेच काय पक्षातील अनेक नेत्यांना याआधी पक्षाचे पद किंवा मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला सांगितले गेले आहे. त्यामुळे अशा पद्धतीने अभिषेक पाटील यांच्याकडून सुरु असलेला दबावतंत्र टाकण्याचा प्रयत्न कितपत यशस्वी ठरतो, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल !

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
Tomato cultivation seminar organized by Jain Irrigation and Kagome India at Jalke-Vavdada was enthusiastic, with a spontaneous response from farmers
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 13, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
जळगाव

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

February 12, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
Next Post

खळबळजनक : पतीसमोरच पत्नीवर सामुहिक बलात्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुलीच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना उपयुक्त साहित्याचे वाटप ; वर्धमान धाडीवाल यांचा उपक्रम

January 8, 2022

चित्तरंजन स्वैन यांनी स्वीकारला मध्य रेल्वेचे अपर महाव्यवस्थापक म्हणून पदभार !

November 16, 2023

बीएचआर घोटाळा : दहा दिवसांपासून मागावर आणि मग केली अटक ; जाणून घ्या झंवरच्या अटकेचा थरार !

August 10, 2021

मंदाकिनी खडसेंना मुंबई हायकोर्टाचा दिलासा ; पुढील सुनावणी १४ मार्चला

February 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group