अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी ग्रंथालय आघाडीतर्फे आयोजित अधिवेशनासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशध्याक्ष जयंत पाटील हे शुक्रवारी अमळनेर येथे आले होते. या कार्यक्रमात चोरट्यांनी तब्बल 26 जणांचे पाकिटासह मोबाईल लांबवल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
अमळनेरात झालेल्या प्रचंड गर्दीचा फायदा घेत संशयितांनी तब्बल 26 जणांचे पाकिटासह मोबाईल लांबवल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांनी एकूण 19 हजार 500 रुपयांची रोकड लांबवल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गौरव उदय पाटील (42, समर्थ नगर, धुळे रोड, अमळनेर) यांच्या फिर्यादीनुसार, समीर शहा सलीम शहा (22, रामदेवबाबा नगर धुळे), हमीदअली मोहम्मद उमर (42, रोशनबाग मालेगाव), उमर फारुख शेख लतीफ (22, आझाद नगर मालेगाव), भैया विक्रम खैरनार (38, बालाजी नगर, शिरपूर) यांना अटक करण्यात आली. पुढील तपास पो.ना. घनश्याम पवार हे करीत आहेत.