जळगाव (प्रतिनिधी) शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तथा माजी महानगराध्यक्ष विनोद देशमुख यांना पक्षविरोधी कारवाई केली. तसेच पक्षातील महिलांविषयी अपशब्द वापरले म्हणून प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या सुचनेनुसार पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे पत्र प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांना ६ ऑक्टोबर रोजी काढले आहे.
शहर आणि ग्रामीण भागातील महिला पदाधिकार्यांबद्दल घाणेरड्या भाषेतील पोस्ट सोशल मीडियावर टाकून त्यांची बदनामी देशमुख यांनी केली होती . खालच्या भाषेत त्यांच्याविषयी खोट्या तक्रारी करून त्यांना धमकावले होते. त्यानंतर देशमुख यांच्याविरोधात प्रदेश कार्यालयाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या . लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचेही निदर्शनास आले होते . विनोद देशमुख यांना ८ सप्टेंबर पर्यंत त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती . त्यांनी काहीच खुलासा न केल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. यासंदर्भात विनोद देशमुख यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांनी सांगितले कि आईच्या निधनामुळे मी जळगावात नाही आणि पक्षाच्या या निर्णयाची मला काहीही माहिती नाही .
















