जळगाव (प्रतिनिधी) १५ मार्च २० रोजी माननीय खासदार उनमेश पाटील सह आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती एडवोकेट सुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे व रियाज बागवान तसेच इतर संस्थांचे व संघटनांचे पदाधिकारी यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण चे प्रोजेक्ट डायरेक्टर चंद्रकांत सिन्हा सोबत चौपदरीकरण मार्गाची पाहणी करून तीन ठिकाणी अंडरपास-भुयारी मार्ग चे डी पी आर तयार करण्याचे आदेश प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले. व वेळ प्रसंगी या तिन्ही कामाच्या मंजुरीसाठी दिल्ली येथे जाऊन गडकरींची मंजुरी घेऊन येईल असे आश्वासन दिले व तसे वृत्त १६ मार्च २० च्या जळगाव स्थानिक वर्तमानपत्रात छापून आलेले आहे.
तीन भुयारी मार्ग पैकी डॉ. अग्रवाल चौकची अंतिम मान्यता व कामास सूरवात होणार
राष्ट्रीय राजमार्ग चौपदरीकरण टेंडर मध्ये दादावाडी, गुजराल पेट्रोल पंप व तीथेच तिसरे से तीन अंडरपास मंजूर होते तेथील एक भुयारी मार्ग शिफ्ट करून ते अग्रवाल चौकात दिले व त्या शिफ्टिंग ची अंतिम मंजुरी दिल्ली येथून आली असून ८ ते १० दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करू असे जंडू कंपनी चे प्रोजेक्ट डायरेक्टर यांनी सांगितले.
शिव कॉलनी भुयारी मार्ग आर्वी असोसिएट च्या मुख्य कार्यालयात मंजुरीसाठी दाखल
माननीय खासदार यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रोजेक्टच्या चेंज ऑफ स्कोपच्या दहा टक्के रक्कम मध्ये शिव कॉलनीच्या भुयारी मार्ग सुमारे साडे चार कोटी रुपयाचे असल्याने ती रक्कम सहा कोटी रुपयात बसत असल्याने राज मार्ग प्राधिकरणच्या मुख्य कार्यालयाची मान्यता घेण्याची आवश्यकता नसल्याने शिव कॉलनी चे साडेचार कोटीचे इस्टिमेट असल्याने त्याला सल्लागार जळगावच्या आर्वी असोसिएट ने मान्यता देऊन त्यांच्या हैदराबाद येथील मुख्य कार्यालयात मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केलेला आहे.
सालार नगर भुयारी मार्ग सेकंड फेज मध्ये कसे होणार?
१५ मार्च २०२० रोजी खासदार महोदयांनी आदेश देऊन सुद्धा कंत्राटदार कंपनी झेंडू कन्स्ट्रक्शन कंपनी, जळगाव ने सल्लागार आर्वी असोसिएट जळगावला २७ नोव्हेंबर २०२० रोजी तेरा कोटी रुपयाचे अंडरपास चे इस्टिमेट १० महिन्यांनी पाठविले असले तरी २१ डिसेंबर २० पर्यंत झेंडू कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कव्हरिंग लेटर सोबत डिटेल डिझाईन आणि ड्रॉईंग आर्वी कंपनी कडे पाठवलेले नाही व ते आम्हास आज पर्यंत मिळाले नाही अशी कबुली अनूप कुमार श्रीवास्तव यांनी फारूक शेख, मझर खान व अनिस शाह यांना भेटीत दिली
सालार नगर अंडरपास चे डिझाईन, ड्रॉईंग व इस्टीमेट सल्लागार यांच्या कार्यालयात २५ दिवस पर्यंत पोहचले नाही आल्यावर जळगाव ला तपासणी होईल त्या नंतर ते हैदराबाद ऑफिसला जाईल तिथे तपासणी व जळगावी स्पॉट व्हीजीट होऊन तेथून न्हाई जळगाव ला येईल, येथून न्हाई नागपूर ला जाईल व नंतर अंतिम मंजुरी साठी दिल्ली येथे जाईल.
निधीला मंजुरीच नाही तर कार्य कसे होणार?
दिल्ली येथे अद्याप मंजुरी सोडा सादरीकरण सुद्धा झालेले नाही. निधी ला मंजुरी नाही म्हणून अंदाजित रक्कम, ड्रॉईंग, ला कोणत्या आधारे मंजुरी मिळणार?
चौपदरीकरण झाल्यावर रस्ता तोडता येईल का?
सालार नगर अंडर पास ची परवानगी मिळाली, निधी मिळाला तर तयार झालेला मार्ग तोडण्याची परवानगी मिळेल का ? न्हाई चे बेजवाबदार पणास लोकप्रतिनिधी विचारणा करणार का? जर सालार नगर भुयारी मार्ग चेंज ऑफ स्कोप च्या रकमेत बसणार नाही तर कशाला जंडू कंपनी ला ड्रॉईंग व इसटिमेट बनवायला लावले? १० महिने वाया गेले त्यास जवाबदार कोण? जर चेंज ऑफ स्कोप या रकमेत शिव कॉलोनीचेच भुयारी मार्ग बसत होते तर तशी स्पष्ट सूचना लोक प्रतिनिधीला का देण्यात आली नाही? विविध संघटना व व्यक्ती लेखी विचारणा करीत असताना त्यांना चुकीची माहिती का देण्यात येत आहे?
आम्ही मागितलेली कोणतीही माहिती का देण्यात येत नाही?
राष्ट्रीय लक्ष साध्य करणे साठी मतभेद नको
निवेदनात-तक्रारीत फारूक शेख यांनी मोदीजीनी २२ डिसेंम्बर रोजी अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना जे शब्द उच्चारले ते प्रकट केले त्या नुसार” समाजात वैचारिक मतभेद असणे साहजिकच असले तरी राष्ट्रीय लक्ष साध्य करायचे असेल तर सर्व मतभेद बाजूला ठेवायला हवे व त्यासाठी आज देशात बनणाऱ्या योजना कोणत्याही धार्मिक भेदभाव शिवाय प्रत्येक घटका पर्यंत पोहचल्या पाहिजे व राष्ट्रीय लक्ष साठी आपले मतभेद दूर ठेवायला पाहिजे’ हे वाक्य लिहून त्यांनी अप्रत्यक्ष मुस्लिम बहुल वस्ती सोबत मतभेद करू नका अशी विनंती केली
पंतप्रधान, गडकरी, प्राधिकरणाच्या अध्यक्षा ते दक्षता अधिकाऱ्यांना निवेदन-तक्रार सादर
फारूक शेख यांनी सविस्तर अशी तीन पानांची तक्रार खासदार उन्मेष पाटील यांच्या अवलोकनार्थ सादर करून त्याच्या प्रति मा. पंतप्रधान, मा. नितीन गडकरी, मा. अध्यक्ष न्हाई, दक्षता अधिकारी न्हाई, जिल्हा अधिकारी जळगाव यांना इ मेल द्वारे सादर केली आहे.