चोपडा (प्रतिनिधी) चोपडा येथील सुधर्म भवन, गांधी चौक येथे प्रदीप मिलापचंद बरडिया यांच्या अध्यक्षतेखाली वर्धमान स्थानकवासी जैन श्री संघ, चोपडा यांच्या झालेल्या साधारण सभेत सुभाषचंद्र किसनलाल बरडिया यांची आगामी दोन वर्षांसाठी (2025- 26) पुन्हा संघपती या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच, संजय चंपालाल बरडिया यांची उपाध्यक्ष पदावर, धीरेंद्र तुळशीराम डाकलिया यांची सचिव पदावर आणि राकेश प्रकाशचंद सुराणा यांची कोषाध्यक्ष पदावर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना समाजाच्या विविध स्तरांतून हार्दिक शुभेच्छा आणि शुभकामना दिल्या जात आहेत.