नशिराबाद (प्रतिनिधी) चौपदरीकरणाच्या कामात विजवाहिनी केबलला तीन ते चार ठिकाणी जोडणी केली आहे. आताच इतकी केबल डोकेदुखी ठरत आहे तर भविष्यात त्याचा किती त्रास होणार म्हणून त्याकरता आत्तापासून नवीन वीजवाहिनी तार टाकण्यात यावी, अशी मागणी वीज वितरण कंपनीने महामार्ग प्राधिकरणाला पत्र देवून केली आहे.
गावाला वीज पुरवठा करणाऱ्या मुख्य ११ के व्ही वीज वाहिनीत वारंवार बिघाड होत असल्यामुळे वीज पुरवठा विस्कळीत होत आहे. चौपदरीकरणाच्या कामात भूमिगत टाकण्यात आलेल्या विजवाहिनी केबलला तीन ते चार ठिकाणी जोड देण्यात आला आहे. त्यामुळे त्यात वारंवार बिघाड होवून वीज पुरवठा ठप्प होत आहे. याबाबत विज वितरण कंपनीने महामार्ग प्राधिकरणाला भूमिगत टाकलेल्या केबलाबाबत अनेकदा पत्रव्यवहार करून समस्येची माहिती दिली आहे. मात्र त्यावर अद्यापर्यंत तोडगा न निघाल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत आहे.
नशिराबाद येथील महामार्गालगत सुनसगाव, बोदवड फाटा, तरसोद फाटा, काझी पेट्रोलपंप या ठिकाणी वारवांर बिघाड होत असल्याची तक्रार वीज वितरण कंपनीने केली आहे. चौपदरीकरणाच्या कामामुळे या ठिकाणी परिसरात भूमिगत केबल टाकण्यात आली आहे. मात्र, चौपदरीकरणाच्या कामात त्या केबलला तीन ते चार ठिकाणी जोडणी केली आहे. आताच इतकी केबल डोकेदुखी ठरत आहे तर भविष्यात त्याचा किती त्रास होणार म्हणून त्याकरता आत्तापासून नवीन वीजवाहिनी तार टाकण्यात यावी, अशी मागणी वीज वितरण कंपनीने महामार्ग प्राधिकरणाला पत्र देवून केली आहे.
गेल्या काही महिन्यापासून भूमिगत टाकलेली केबल महामार्ग प्राधिकरण विभागाला विज वितरण कंपनीने पत्र देवून माहिती दिली. हि केबल नवीन टाकण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली अशी माहिती वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता पवन वाघुळदे यांनी पत्राद्वारे दिली. महामार्ग प्राधिकरण सदरील समस्याबाबत दखल घेत नसल्याबाबत खंत व्यक्त करण्यात आली. महामार्गालगत इलेक्ट्रिक खांब जवळ झाले आहे. त्यामुळे खांब स्थलांतरणाबाबातही पत्रव्यवहार केला.
समस्येबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल – चंद्रकांत सिंह
या समस्येबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल समस्या सोडण्याबाबत संबधितांना सूचना देण्यात आली आहे, असे महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिंह यांनी सांगितले