धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या” सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक” मुख्य परीक्षा 2020- या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत अमळनेर येथील निखिल ठाकूर यांची सहायक मोटर वाहन निरीक्षक (आरटीओ) पदी निवड झाल्याबद्दल आयपीएस आधिकरी विश्वास नागरे पाटील लिखित ‘मन मे हैं विश्वास’ हे पुस्तक भेट देण्यात आला.
परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यानुसार एकूण 233 उमेदवारांची प्रस्तुत पदाकरिता अंतिम निवड करण्यात आली आहे. निखिल अनिल ठाकूर यांची या पदाकरिता पहिल्याच प्रयत्नात निवड झाली असून त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या यशाचे संपूर्ण श्रेय निखिल आपला परिवार तसेच त्यांचे गुरुवर्य यांना प्रदान केला आहे. या सत्कार प्रसंगी कर्तव्य बहुदेशिय संस्थेचे अध्यक्ष सुनीलभाऊ चौधरी, प्रा.डॉ. सुभाष महाजन, मुख्याध्यापक हिम्मत चौधरी सर, वडील अनिल आप्पा ठाकूर आणि अनिल चौधरी, शरद चौधरी, गोपाल चौधरी इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.सुभाष महाजन यांनी केले. तर आभार सुनील महाजन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.मयुरी महाजन,भैय्याभाऊ महाजन,मनीष चौधरी यांनी परिश्रम घेतले.