धरणगाव (प्रतिनिधी) धुळे जिल्ह्यातील निमगूळ येथे २ दिवसांपुर्वी दोन वर्षीय बलिकेवर झालेला अत्याचार व जीवे ठार मारल्याप्रकरणी सकल माळी बांधवांच्या भावना दुखावल्या असून याप्रकरणात असलेल्या खरे गुन्हेगारांचा त्वरीत शोध घेवून कडक कारवाई करावी, अशी मागणी संत सावता माळी संघटने कडून करण्यात आली आहे. या घटनेचे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत याबाबत निवेदन तहसिल कार्यालय व पोलीस स्टेशन धरणगाव यांना देण्यात आले.
निमगूळ ता.जि. धुळे येथील अतिशय गरीब असलेले प्रवीण रामराव माळी शनिवारी रात्री कुटुंबासह झोपले होते. अज्ञात व्यक्तीने माळी कुटुंबीयांजवळ झोपलेल्या २ वर्षीय बालिकेला उचलून गावापासून दोन कि.मी.अंतरावरील विहिरीत फेकून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. बालिकेवर अत्याचार करून विहिरीत फेकण्यात आले, पूर्व वैमनस्यातून खून झाला की नरबळी..? असा प्रश्न आहे. माळी कुटुंबातील बालिका कु. प्राची व तिचे वडील प्रवीण माळी कुटुंबासह झोपले होते. रात्री साडे बारा वाजता प्रवीण माळी उठले असता त्यांना अंथरुणावर त्यांची दोन वर्षीय बालिका दिसली नाही. सभोवतालच्या रहिवाश्यांनाही विचारले, त्याबाबत कोणीही सांगू शकले नाही. सर्वत्र शोध घेतले असता गावाजवळील दोन किमी अंतरावरील विहिरीत बालिकेच्या मृतदेह तरंगताना दिसून आला. याला नेमकं जबाबदार कोण? या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ फाशी देण्यात यावी.
निमगूळ येथील मयत बालिकेवर नको तसे कृत्य केल्याप्रकरणी सर्व समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत माळी समाजाचे कैलास वाघ सर व जितेंद्र महाजन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्री.संत सावता माळी संघटनेच्या वतीने धरणगांव तहसिलदार नितिनकुमार देवरे , धरणगांव पी. आय. पवन देसले साहेब , गुप्तचर खात्याचे मिलिंद सोनार, यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
यावेळी शिक्षक आघाडी अध्यक्ष कैलास वाघ, यांचा मार्गदर्शन खाली,जिल्हा सल्लागार विनायक महाजन, जिल्हा उपाध्यक्ष समाधान महाजन, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र महाजन, तालुका अध्यक्ष निलेश माळी, तालुका उपाध्यक्ष दिनेश महाजन, बहुजन क्रांती मोर्चाचे राजेंद्र वाघ, शहर अध्यक्ष जयेश महाजन, गोरख देशमुख , शहर संपर्क प्रमुख निलेश महाले, शहर कार्याअध्यक्ष बंटी महाजन, मीडिया प्रमुख योगेश्वर बाविस्कर, राकेश माळी, महेंकाळे चे मा.सरपंच सुरेश महाजन, तसेच श्री.संत सावता माळी युवा संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.