धरणगाव (प्रतिनिधी) शहरात ३ एप्रिल रोजी होणाऱ्या श्री भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाचे आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना जैन समाज बांधवांनी निमंत्रण दिले आहे.
आज नामदार गुलाबराव पाटील यांना श्री भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव दि 3 एप्रिल 2023 सोमवार रोजी आयोजित कार्यक्रमानिमित्त आमंत्रण देण्यासाठी आज जैन समाजाच्या पंच मंडळाने भेट घेतली. यावेळी नामदार गुलाबराव पाटील यांनी धरणगाव येथील श्री कामधेनू गो सेवा शाळेस भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी मा.नगराध्यक्ष, अजयशेठ पगारीया, डॉ.मिलिंद डहाळे, किशोर डेडीया, सुमित संचेती, संजय ओस्तवाल, प्रवीण कुमट, अरविंद ओस्तवाल, मुकेश पगारीया, जतिन नगरीया, गितेश ओस्तवाल यांच्यासह आदी पंच मंडळ उपस्थित होते.