TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २८ मार्च २०२३ !

जाणून घ्या...मार्चचा शेवटचा मंगळवार तुमच्यासाठी कसा असेल !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 28, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : घरासाठी आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाजारात जाऊ शकता, ज्यामुळे तुमचे मन शांत राहील. प्रेम जीवनामध्ये काही कारणाने तणाव येऊ शकतो, बोलून परिस्थिती सोडवा. सामाजिक सन्मान वाढेल. आशावादी दृष्टीकोन ठेवावा. खाण्यापिण्याची चंगळ राहील. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत. व्यावसायिक नियम काटेकोरपणे पाळावेत.

वृषभ : कौटुंबिक व्यवसायात कोणताही बदल कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घेऊन करा, कुटुंबातील सदस्यांच्या सल्ल्याने प्रगती आणि आत्मविश्वास वाढेल. आज, व्यावसायिकांना आर्थिक लाभाची शक्यता निर्माण होत आहे. धार्मिक गोष्टींत मन रमवा. वरिष्ठांना नाराज करू नका. लहानांच्या आनंदात सहभागी व्हाल. आनंदी दृष्टिकोनाने वागाल. अभ्यासूपणे नवीन गोष्टींत रस घ्याल.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

मिथुन : कुटुंबात काही वाद सुरू असतील तर ते आज मिटताना दिसत आहे. आज लहान मुलांसोबत चांगला वेळ घालवाल. वैवाहिक जीवनात आदर वाढेल आणि भेटवस्तू मिळू शकते. विद्यार्थी त्यांच्या स्पर्धेच्या तयारीत व्यस्त दिसतील. काही गोष्टी इच्छेविरूद्ध कराव्या लागतील. घरात मोठ्या लोकांची ऊठबस राहील. वडीलधार्‍यांचे मत विचारात घ्यावे. पत्नीचे उत्तम सहकार्य लाभेल. मनातील चुकीच्या गोष्टी काढून टाका.

कर्क : परदेशात जाण्याची शक्यता प्रबळ असेल. आरोग्याबाबत जागरुक राहा. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन प्रोजेक्टवर काम करायला मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल. जुन्या मित्रांकडून पैशाची अपेक्षा आहे. आज मुलाच्या काही शारीरिक समस्या असू शकतात, त्यामुळे काळजी घ्या. मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. इतरांना तुमच्या भेटीने आनंद वाटेल. उत्तम आर्थिक प्राप्ती येईल. चांगले वाहन सौख्य लाभेल. स्त्रियांच्या मदतीचा लाभ होईल.

सिंह : आज तुमच्या कौटुंबिक खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा जास्त खरेदी मासिक बजेट बिघडू शकते. मित्रांसोबत गुंतवणुकीच्या योजना कराल. आज तुम्हाला काही कौटुंबिक गरजांसाठी धावपळ करावी लागू शकते. व्यावसायिकांना आज रोख रकमेची गरज भासू शकते. व्यावसायिक ठिकाणी अनुकूलता राहील. सहकार्‍यांच्या कौतुकास पात्र व्हाल. व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल. तिखट व तामसी पदार्थ खाण्याचे टाळा. चैनीच्या वस्तू खरेदी कराल.

कन्या : तुम्ही कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यातून आर्थिक फायदा होईल. संध्याकाळी काही वादामुळे कुटुंबात कटुता निर्माण होऊ शकते, पण संयम ठेवा. व्यावसायिकांची स्थिती चांगली असल्याचे दिसून येईल. विद्यार्थ्यांना आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल. मैदानी खेळ खेळाल. शैक्षणिक कामाला गती येईल. नवीन अनुभव मिळतील. जोडीदाराशी मतभेद संभवतात. रागाला आवर घाला.

तूळ : तुम्हाला तुमच्या मित्राचीही व्यवस्था करावी लागेल. परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना अधिक एकाग्रतेची आवश्यकता असेल. मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद सुरू असेल तर आज परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसेल. नोकरी आणि कार्यक्षेत्रात अधिकारी वर्गाचे पूर्ण सहकार्य मिळेल. अचानक धनलाभ संभवतो. जोडीदाराचे कौतुक कराल. भागीदारीत नवीन धोरण आजमावाल. घरगुती कामात वेळ जाईल. अतिघाई उपयोगाची नाही.

वृश्चिक : कौटुंबिक संपत्तीचा लाभ घ्याल. एखादे नवीन काम सुरू करायचे असेल तर नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यवसायात सुधारणा करण्यासाठी काही बदल करावे लागतील, तरच प्रगतीच्या संधी मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. स्त्री सौख्यात अधिक रमाल. जवळचा प्रवास कराल. एकमेकांना समजून घ्यावे. प्रकृतीत सुधारणा दिसून येईल. मुलांचा खोडकरपणा वाढेल.

धनू : कौटुंबिक सदस्याच्या तब्येतीची चिंता असू शकते, ज्यामुळे जास्त धावपळ होऊ शकते. यामुळे कौटुंबिक वातावरण काहीसे नैराश्यात राहू शकते. इच्छित शिक्षण मिळविण्यासाठी तुम्हाला अधिक संघर्ष करावा लागू शकतो. काही जुन्या मित्रांशी बोलल्याने आज मानसिक शांती मिळेल. हाताखालील लोकांकडून कामे करून घेता येतील. कौटुंबिक प्रश्न आधी सोडवाल. जवळचे मित्रमंडळी गोळा कराल. जोडीदाराशी क्षुल्लक कारणांवरून मतभेद वाढवू नका. व्यसनांच्या आहारी जाऊ नका.

मकर : कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल आणि सरकारकडून सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात काही अडथळे येऊ शकतात. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा राहील. प्रेम जीवनला कायमस्वरूपी नात्यात बदलण्याची योजना आखली जाईल. तुम्ही केलेला व्यायाम चांगला परिणाम देईल. काहीसे हेकेखोरपणे वागाल. सरकारी कामात यश येईल. रखडलेल्या कामाला गती येईल. उगाच चीड-चीड करू नका. संयमी धोरण ठेवावे.

कुंभ : तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. वैवाहिक जीवनात भांडणामुळे काही मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. जोडीदाराचा विश्वास जिंकणे आवश्यक असेल. कुटुंबात असे काही खर्च समोर येतील, जे तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्धही करावे लागतील आणि काही कौटुंबिक वादही आज तुमच्यासमोर येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमचा वरचष्मा राहील. अधिकाराने कामे हातावेगळी कराल. घरगुती वस्तूंची खरेदी करता येईल. मनमोकळ्या गप्पा माराल. नवीन मित्र जोडावेत.

मीन : तुम्ही केलेला व्यायाम चांगला परिणाम देईल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायाला नवी गती देण्याचा प्रयत्न करताना दिसाल. कोणत्याही वादात पडणे टाळा. नातलगांशी सलोखा वाढेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. प्रवासाची हौस पूर्ण कराल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. तुमची आवड-निवड दर्शवाल. (Today Rashi Bhavishya, 28 March 2023)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

जुन्नरमध्ये जीपने ८ जणांना चिरडले, ५ ठार, २ चिमुकल्यांचा समावेश, ३ गंभीर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात दिव्यांग जनजागृती रॅलीचे आयोजन !

December 4, 2023

लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नीची पतीला खतरनाक धमकी ; पतीला बसला जबर धक्का !

March 14, 2022

Казино Вулкан Рояль Или Как Выиграть Деньги В Онлайн Клубе

November 11, 2022

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

April 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group