पाचोरा (प्रतिनिधी) जळगाव जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी तिन दिवसीय जनता कर्फ्यू जाहीर केले त्यात पाचोऱ्याचा अद्याप निर्णय झालेला नसल्याचे सचिन सोमवंशी यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्य़ातील अनेक तालुक्यातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून त्यामुळे कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी येथील उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अद्याप जनता कर्फ्यू मध्ये पाचोऱ्याचा निर्णय झालेला नाही. रात्री उशिरापर्यंत काय निर्णय घेण्यात येईल याकडे लक्ष लागले आहे.
जनता कर्फ्यू म्हटले की सामान्य नागरिक, व्यापारी सह मजुर वर्गामध्ये घबराट निर्माण होते. यामुळे आर्थिक व्यवहार कोलमडले जातात. यासाठी पाचोऱ्यात संभ्रम निर्माण झाला होता. आज तरी जनता कर्फ्यूचा निर्णय नसल्याचे कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी सागितले आहे. ते पुढे म्हणाले की, कोरोना महामारी वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्या शहरातील खाजगी कोविड हॉस्पिटल खुले झाले आहेत. कोरोनाला घाबरू नका त्याच्याशी लढा द्यावा लागेल त्यासाठी काळजी घ्यावी जेणेकरून आपल्या काळजी मुळे जनता कर्फ्यू आपल्या शहरात लागणार नाही आणि आर्थिक झळ बसणार नाही. असे सोमवंशी यांनी म्हटले आहे.