कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथे शुक्रवार दि. १३ ऑगस्ट रोजी विविध विकास कामांचे भूमिपूजन कॅबिनेट मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार चिमणराव पाटील भूषविणार आहेत.
श्री महादेव मंदिर परिसर तसेच मेन रोड पर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे व सुशोभीकरण करणे, सेंट्रल बँक जवळ श्री प पु गोविंद महाराज भव्य दिव्य प्रवेश द्वार, कासोदा ते खडके रस्ता डांबरीकरण करणे, बांभोरी गावापासून मोरी बांधणे व डांबरीकरण करणे, ही कामे कॅबिनेट मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या स्थानिक निधीतून होणार आहे तसेच डॉक्टर हर्षल माने जि प सदस्य यांचा स्थानिक निधीतून श्री महादेव मंदीर पासून समशान भूमी पर्यंत रस्ता डांबरीकरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार चिमणराव पाटील भूषविणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गुलाबराव वाघ, डॉक्टर हर्षल माने, वासुदेव पाटील ,अमोल चिमणराव पाटील, ज्ञानेश्वर धोंडू आमले, प्रतापराव गुलाबराव पाटील, शांताबाई सखाराम रोकडे, किशोर निंबाळकर, जगदीश पाटील, नाना भाऊ महाजन, राजेंद्र चौधरी, बबलू पाटील, मोहन भाऊ सोनवणे, अनिल रामदास महाजन, विवेक पाटील, दिलीप सखाराम रोकडे, वैशाली मंगल गायकवाड, संजय तोताराम पाटील, गबाजी किसन पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमे ठिकाण श्री महादेव मंदिर कासोदा कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी ६ वाजता असणार आहे,अशी माहिती संयोजकांनी दिली आहे.