नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल १२ हजारांनी वाढ झाली. गेल्या २४ तासांत ३७ हजार ५९३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ६४८ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३७,५९३ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ६४८ कोरोनाबाधितांना आपला जीव गमावावा लागला आहे. सोमवारी २५,४६७ कोरोना बाधितांची नोंद झाली होती. तर मंगळवारी ३४,१६९ लोक कोरोनातून बरे झाल्याने २७७६ सक्रिय रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मंगळवारच्या तुलनेत कोरोनाच्या प्रकरणांमध्ये सुमारे ४७ टक्के वाढ झाली आहे. देशात सक्रिय प्रकरणांची संख्या अजूनही ३,२२,३२७ आहे. त्याचबरोबर देशात आतापर्यंत ५९.५५ कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. याशिवाय, देशात सध्याचा रिकव्हरी रेट ९७.६७ टक्के आहे आणि गेल्या २४ तासांमध्ये ३४१६९ लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. मंगळवारी देशात कोरोनाची २५,४६७ नवीन प्रकरणे समोर आली आहेत.
कोरोनाच्या सुरुवातीपासून देशात महामारी सुरू झाल्यापासून एकूण तीन कोटी २५ लाख १२ हजार लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी ४ लाख ३५ हजार ७५८ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३ कोटी १७ लाख ५४ हजार लोक बरे झाले आहेत. देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे. एकूण ३ लाख २२ हजार लोकांना अजूनही कोरोना विषाणूची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राज्यातील स्थिती
राज्यात मंगळवारी ४ हजार ३५५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार २४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ४३ हजार ०३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के आहे. राज्यात मंगळवारी ११९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.११ टक्के झाला आहे. तब्बल ३८ महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या ४९ हजार ७५२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त ११,९६२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.