धरणगाव (प्रतिनिधी) येथील लहान माळी वाड्यात राम जन्मभुमी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न झाले. 16 जानेवारी 2024 पासुन रोज सकाळी 5 वाजेपासुन श्री राम जय राम जय जय रामाचा जयघोष करीत असंख्य रामभक्त व महिला पुरूष बाल गोपालांची प्रभात फेरी काढण्यात आली.
सदर प्रभात फेरी लहान माळी वाडा समाज मंदीरा पासुन सकाळी 5 वाजता प्रारंभ होऊन नवेगांव, सिद्धी हनुमान मंदीर, कोट बाजार, गुजराथी गल्ली, श्री राम मंदिरावरून भावसार गल्ली, समाज मंदीरावर श्री रामाची आरती हनुमान चालीसा रामरक्षाचा कार्यकम संपन्न झाला .तसेच दि. २२ रोजी संध्याकाळी सिध्दी हनुमान मंदिरावर श्री राम व हनुमानाची महाआरती करुन प्रसाद वाटप करण्यात आले. त्यात हजारो संख्येने रामभक्त सहभागी झाले होते.
जयहिंद गणेश मित्र मंडळाच्या वतीने श्री रामाची प्रतिमा ठेवून विधिवत पूजा करण्यात आली. तर जयहिंद व्यायाम शाळेजवळ परिसरात असंख्य महीला पुरुष व विदयार्थी यांनी सामुहिक श्री रामरक्षा हनुमान चालीसा, मारोती स्तोत्र व रामाचे भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी श्रीराम सीता लक्ष्मण हनुमान शबरी यांचा सजीव देखावा सादर केला व त्यांची शोभा यात्रा श्री राम नामाचा जय घोषात सिद्धी हनुमान मंदीरा पर्यंत काढण्यात आली. तसेच स्रीशक्ती नारी शक्ती महिला मंडळाचा वतीने तेलाठी गल्ली येथे सामुदायिक श्री रामरक्षा हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीते साठी परिसरात सर्व श्री राम भक्त व भाविक यांनी परिश्रम घेतले.